Shravan 2021 : कोटा येथे आहे तब्बल ५२५ शिवलिंगांचे शिवालय; त्यांच्या दर्शनाने मिळते १२ ज्योर्तिर्लिंगांचे पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 05:47 PM2021-08-12T17:47:28+5:302021-08-12T18:03:35+5:30

Shravan 2021 : श्रावणात शंकर पूजेला अधिक महत्त्व असते. त्यात आपल्याला जर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. परंतु सद्यस्थितीत अजून प्रवासाला कुठेही जाण्याची मुभा नसल्यामुळे ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे. या १२ ज्योतिर्लिंगांइतकेच राजस्थान येथील कोटा येथे एक शिव धाम आहे. तिथे एक दोन नाही तर ५२५ शिवलिंग आहेत. त्यांच्या दर्शनाने १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते असे म्हणतात. सध्या तिथेही जाणे शक्य नसल्याने आपण फोटोतून शिवदर्शन घेऊया.

कोटा येथील शिव धाम अतिशय प्रचलित आहे. तिथे जाणारी व्यक्ती या शिवालयाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही.

या शहरात आणखीही अनेक शिव मंदिरं आहेत परंतु या शिवधामात गेल्यावर वेगळीच प्रसन्नता जाणवत असल्याची भक्तांना प्रचिती येते.

५२५ शिवलिंग एका जागी असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. या व्यतिरिक्त नेपाळ येथील पशुपतीनाथ येथे ५२५ शिवलिंगाचे दर्शन होते.

येथील शिवलिंगाला अभिषेक केल्याने ५२५ शिवलिंगांच्या अभिषेकाचे पुण्य मिळते.

काही भक्तांना येथे शिवलिंगाची मोजणी केल्यावर ती केवळ ५२५ नसून एक हजार शिवलिंग असल्याची अनुभूती आली आहे. हा श्रद्धेचा आणि देवत्त्वाच्या प्रचितीचा भाग म्हटला पाहिजे.