शनीचे नक्षत्र गोचर: ६ राशींना नशिबाची साथ, बिझनेसमध्ये नफा; लाभासह यश-प्रगतीची अपार संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 07:07 AM2024-04-05T07:07:07+5:302024-04-05T07:07:07+5:30

एप्रिल महिन्यात होत असलेले शनीचे नक्षत्र गोचर काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी नक्षत्र किंवा राशीपरिवर्तन करतो, तेव्हा मानवी जीवनावर त्याचा व्यापक प्रभाव पडतो, असे म्हणतात. शनी हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. शनीच्या संथ गतीमुळे त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो.

०६ एप्रिल २०२४ रोजी शनी पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात गोचर करणार आहे. विद्यमान स्थितीत शनी स्वतःचे स्वामित्व असलेल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. शनीची ही मूलत्रिकोणी रास मानली जाते. त्यामुळे शश नामक राजयोग जुळून आला आहे.

शनीच्या नक्षत्र गोचराचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येऊ शकेल. मात्र, काही राशींवर शनीच्या नक्षत्र गोचराचा विशेष प्रभाव पडेल. नशिबाची साथ लाभेल. करिअर आणि व्यवसायात नवी उंची गाठता येऊ शकेल. नेमक्या कोणत्या ६ राशींवर शनीचा शुभ प्रभाव दिसू शकेल? जाणून घेऊया...

मेष: आर्थिक लाभ होऊ शकेल. नवीन घर, जमीन किंवा फ्लॅट खरेदी करू शकता. विशेषत: व्यवसाय करणाऱ्यांना चांगली डील मिळू शकतो. करिअर उजळेल. सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील. यश-प्रगतीची संधी मिळू शकेल.

वृषभ: शनीच्या नक्षत्र गोचरामुळे नोकरी, व्यवसायात प्रगती होऊ शकेल. प्रमोशनची चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पद आणि प्रतिष्ठा वाढू शकेल. मान-सन्मानही मिळू शकतील. करिअरमध्ये प्रगती होऊ शकेल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.

कन्या: पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचे गोचर शुभ ठरेल. कामात यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होऊ शकेल. नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. सुखसोयींमध्ये वाढ झालेली दिसेल. अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृश्चिक: सर्व प्रकारचे सुख मिळू शकेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. चांगले डील मिळण्याची शक्यता आहे. शनिदेवाची विशेष कृपा असेल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात आणि घरात चांगला सन्मान मिळेल. वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील.

धनु: इच्छित ठिकाणी नोकरी मिळू शकते. लाभ मिळेल. व्यवसायिकांना फायदा होऊ शकतो. स्टार्टअपला गती मिळू शकते. नोकरीत अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. जोडीदारासोबत चांगला समन्वय राहील. मन प्रसन्न राहील. चांगली बातमी मिळू शकते.

कुंभ: शनीचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकेल. आदर, आत्मविश्वास आणि संपत्ती वाढण्याची चांगली संकेत आहेत. स्थान आणि प्रतिष्ठा वेगाने वाढेल. नवीन योजना प्रत्यक्षात येतील. सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.