संकष्ट चतुर्थी मार्च २०२६: ७ राशींना वरदान काळ, अनपेक्षित नफा; धनलक्ष्मी कृपा, कल्याण-मंगल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:45 IST2026-03-05T19:32:51+5:302026-03-05T19:45:36+5:30
Sankashti Chaturthi March 2026 Astrology: संकष्ट चतुर्थीला अनेक शुभ राजयोग जुळून आलेले आहेत. कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

Sankashti Chaturthi March 2026 Astrology: शुक्रवार, ०६ मार्च २०२६ रोजी फाल्गुन संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात.

संकष्ट चतुर्थीला कुंभ राशीत सूर्य, बुध, मंगळ आणि राहु यांचा चतुर्ग्रही योग जुळून आलेला आहे. तर मीन राशीत शनि आणि शु्र यांचा युती योग जुळून आलेला आहे. तसेच बुधादित्य, मंगल आदित्य आणि धनयोग असे राजयोग जुळून आलेले आहेत. त्यामुळे हा संकष्ट चतुर्थीचा काळ अतिशय शुभ लाभदायक मानला गेला आहे.

या सर्व शुभ योगात असलेल्या संकष्ट चतुर्थीचा कालावधी कोणत्या राशींसाठी वरदान काळाप्रमाणे असेल, गणपती बाप्पा, लक्ष्मी देवीची कोणत्या राशींवर अपार कृपा असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: समस्या आपोआप सुटतील. मनातील काळजी निघून जाईल. मात्र, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. केवळ वरवर प्रशंसा करणारे लोक ओळखा. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. खाणे-पिणे आणि व्यायाम याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. एखाद्या कामानिमित्त प्रवास घडून येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. घरातील वातावरण थोडे नरमगरम राहील. वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी. नोकरीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. महत्त्व वाढेल. त्याचबरोबर कामाचा ताण पण असेल, थोडे संयमाने व गोडीत बोलून आपली कामे करून घ्यावी. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे.

मिथुन: भावंडांशी गैरसमज होतील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. मात्र, कायमच आपली बाजू वरचढ राहील, असे गृहीत धरून चालू नका. व्यवसायात अंदाज चुकू शकतो. काही लोकांकडून अपेक्षाभंग होईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रवासात सतर्क राहा. काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत पगारवाढ व सोयी-सुविधा वाढवून मिळतील.

कर्क: भेटीगाठी होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनेक अडचणी दूर झालेल्या असतील. त्यामुळे मोठे प्रकल्प हाती घेण्यात रस राहील. मात्र, अवास्तव अपेक्षा ठेवू नका. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. भावंडांशी सख्य राहील. व्यवसायात भरभराट होईल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. प्रवासात नवीन ओळखी होतील. नवीन माहिती कळेल. नोकरीत अनुकूल बदल होऊ शकतात. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील.

सिंह: सुरुवातीला संयम ठेवा. काही अडचणी आल्या तरी कामे नेटाने करीत राहा. अनावश्यक खर्च आणि दगदग करू नका. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. जीवनसाथीशी वाद टाळा. ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील.

कन्या: हाती पैसा येईल. काही अचानक खर्च उद्भवू शकतात. इतरांच्या भानगडीत पडू नका. नियमानुसार कामे करा. प्रवास शक्यतो टाळा. अनोळखी व्यक्तीला गोपनीय माहिती देऊ नका. परिस्थिती आटोक्यात येईल. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील, भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील.

तूळ: कार्यक्षेत्रात अनुकूल बदल होतील. योग्यतेची दखल घेतली जाईल. उच्च पद व विविध प्रकारचे लाभ होतील. घरी पाहुणे मंडळी येतील. लोकांना गृहीत धरून चालू नका. काही लोक नाराज होतील. प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत बसण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा. काहींना प्रवास घडून येईल. प्रवासात खर्च होईल. एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल.

वृश्चिक: कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. काही किरकोळ अडचणी वगळता हा कालावधी चांगला जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नोकरीत अचानक काही बदल होऊ शकतात. बदलांकडे सकारात्मक पद्धतीने पाहा. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अडलेली कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु: अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र, फार दगदग होईल, अशी कामे करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वेळ वाया घालवणाऱ्या रिकामटेकड्या मित्रांपासून दूर राहा. नोकरीत नवीन बदल होतील. त्याचा निश्चितच फायदा होईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल.

मकर: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. एखाद्या बातमीमुळे मन आनंदित होईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू मिळतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. या काळात आपण झेपतील तेवढीच कामे अंगावर घ्यावी. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नवीन ओळखीचे फायदे होतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. कलाकार मंडळींना पुरस्कार जाहीर होतील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.

कुंभ: वाहन जपून चालवा. साधकबाधक अनुभव येतील. महत्त्वाच्या योजना गुप्त ठेवा. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. सतत व्यस्तता राहील. जीवनसाथीशी किरकोळ कारणावरून गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लोकांच्या भानगडीत पडू नका. आपण भले की आपली कामे भली, असे धोरण ठेवा. अडचणी दूर होतील. मुलांची प्रगती होईल.

मीन: चंद्राचे भ्रमण संमिश्र फळे देणारे ठरेल. सुरुवातीला एखादी चांगली बातमी कळेल. विरोधकांच्या कारवाया थंडावतील. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी. सार्वजनिक कार्यात असणाऱ्यांनी मौन बाळगणे फायदेशीर ठरेल. जीवनसाथीशी मथुर संबंध राहतील. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. प्रवासात ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















