संकष्ट चतुर्थी २०२६: तिजोरी कधीच रिकामी होणार नाही; संकष्टीला बाप्पाला अर्पण करा 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:28 IST2026-02-04T11:18:36+5:302026-02-04T11:28:47+5:30
Sankashti Chaturthi 2026: ५ फेब्रुवारी २०२६ रोजी येणारी संकष्ट चतुर्थी ही विशेष फलदायी आहे. जर तुमच्याकडे पैसा येतो पण टिकत नाही, मुलांच्या अभ्यासाची चिंता आहे किंवा कामात अडथळे येत आहेत, तर या दिवशी केलेले काही शास्त्रीय उपाय तुमचे नशीब बदलू शकतात.

प्रत्येक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचा दिवस मानली जाते. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ महिन्यातील संकष्टी आहे. या दिवशी श्रद्धेने केलेले छोटे उपाय जीवनातील आर्थिक चणचण आणि मुलांच्या प्रगतीमधील अडथळे दूर करू शकतात. तर पाहूया, संकष्टी चतुर्थीला करायचे ३ प्रभावी 'सिद्ध' उपाय!

पैसा आकर्षित करण्यासाठी 'कवड्यांचा' उपाय:
११ पांढऱ्या कवड्या घ्या, त्यांना व्यवस्थित हळद लावा आणि गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा. पूजा झाल्यानंतर या कवड्या एका पिवळ्या किंवा लाल कापडात बांधून पुडी तयार करा. ही पुडी तुमच्या तिजोरीत किंवा रोजच्या वापराच्या बॅगेत ठेवा. या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन पैसा चुंबकासारखा आकर्षित होतो.

मुलांच्या अभ्यासासाठी 'दुर्वा' आणि 'हळद':
दुर्वांच्या ७ जुड्या घ्या आणि त्या हळदीच्या पाण्यात भिजवा. या ७ जुड्या मुलांच्या हातून गणपतीच्या चरणी अर्पण करा. यामुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते, स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात त्यांची प्रगती होते.

चंद्रोदयाचा विशेष उपाय (अर्घ्य):
संकष्टीला चंद्राचे दर्शन आणि पूजन अनिवार्य मानले जाते. ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९:४८ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. चंद्रोदय झाल्यावर रात्री ९:५० मिनिटांनी चंद्राला जल अर्पण करा (अर्घ्य द्या). अर्घ्य देताना 'ओम सोमाय नमः' या मंत्राचा ११ वेळा जप करा. यामुळे मनाला शांती मिळते आणि मानसिक तणाव दूर होतो.

५ फेब्रुवारीच्या संकष्टीचा विशेष योग
दिवस: गुरुवार (गुरू आणि गणपतीचा योगायोग अधिक शुभ मानला जातो). चंद्रोदय वेळ: रात्री ९:४८ मिनिटे. या दिवशी उपवास धरून बाप्पाची पूजा केल्याने सर्व संकटांचे निवारण होते.

















