Ravi Gochar 2025: शनि-रवि संयोग, 'या' चार राशींच्या जीवाला लावेल घोर; पुढचे ३० दिवस जरा सावधच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:21 IST2025-02-06T14:54:46+5:302025-02-06T15:21:56+5:30

Ravi Gochar 2025: ग्रहांचा राजा सूर्य सध्या मकर राशीत असून आता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्याचा संयोग निर्माण होईल. वास्तविक पाहता हे पिता पुत्र असूनही त्यांचे परस्परांशी पटत नाही. त्यामुळे त्यांना शत्रू ग्रह म्हटले जाते. मकर आणि कुंभ या राशीचे स्वामी शनिदेव आहेत आणि त्यांच्या राशीत वडिलांचा अर्थात सूर्यदेवाचा प्रवेश होत असल्याने पिता पुत्राचे आपसांतील वैर चार राशींसाठी तापदायी ठरू शकेल.

न्यायाची देवता शनि मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेवाने मकर राशीत प्रवेश केला, मात्र तेव्हा शनी देव स्वगृही अर्थात आपल्या दुसऱ्या राशीत विराजमान होते. मात्र सूर्यदेव आपल्या नियोजित स्थितीनुसार पुढच्या राशीत अर्थात कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. १२ फेब्रुवारीला सूर्याचे स्थित्यंतर (Ravi Gochar 2025) होणार आहे आणि १४ मार्चपर्यंत ते शनिबरोबर राहतील. तिथून पुढे सूर्य मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा दोन ग्रहांचा आणि चार राशींचा तिढा सुटेल. तोवर कोणत्या राशींनी सावध पवित्रा घ्यायला हवा ते जाणून घेऊ.

कर्क राशीच्या लोकांना सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. लोकांशी नम्र वागा. अन्यथा सुरू असलेले कामही खराब होईल. नात्यात मतभेद निर्माण होतील. अपघात होणार नाही याची काळजी घ्या, वाहन जपून चालवा.

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ वैवाहिक तणाव वाढवणारा ठरू शकतो. जोडीदाराशी सामंजस्याने वागून वाद टाळता येतील. या काळात नवीन काम सुरू करणे टाळा. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांनीसावध राहा आणि गोष्टीवर लक्ष ठेवा.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी थोडी प्रतीक्षा करा. शारीरिक-मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. या काळात श्रद्धा आणि सबुरी ठेवा, मार्ग मिळेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी, सूर्य आणि शनीचा संयोग काही प्रमाणात लाभ देईल परंतु काही नुकसान देखील करेल. कारण सूर्य आणि शनीची भेट कुंभ राशीतच होत आहे. नवीन कार्याची सुरुवात करताना घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.