Ram Navami 2025 Wishes: रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' सुंदर गीतरामायणाच्या ओळींसह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 23:03 IST2025-04-05T18:52:18+5:302025-04-05T23:03:25+5:30

Ram Navami 2025 Wishes in Marathi: गीतरामायणाला यंदा ७० वर्ष पूर्ण होत आहेत. अनेक भाषेत याचा अनुवाद झाला आणि एवढी वर्ष लोटली, तरी त्याची मोहिनी अद्याप उतरली नाही. त्यातील प्रासादिक शब्द म्हणजे रामकथेचा शब्दपटच! ते वर्णन वाचताना ऐकताना राम चरित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्याच शब्दांचा आधार घेत आज आपणही राम नवमीच्या शुभेच्छा देऊया.

अयोध्येचा राजपुत्रच नाही, तर रावणाचा शत्रू जन्माला आला, त्या श्रीरामचंद्र जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा - Marathi News | Ram Navami 2025 Wishes in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

सावळा रामचंद्र मोठा होऊन कर्तृत्त्व गाजवेल याची कौसल्या मातेला शाश्वती होती आणि तो विश्वास ज्याने सार्थ ठरवला त्या राम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!

सीतेला मिळाला तसा एकपत्नीव्रत नवरा आपल्याला मिळावा अशी इच्छा प्रत्येक मुलीची असते, अशा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!

रामचंद्र सिंहासनावर बसणार, अयोध्येला नवा राजा मिळणार, याचा आनंद अवर्णनीय, ते रामराज्य पुन्हा स्थापित व्हावे, या राम नवमीच्या शुभेच्छा!

जिथे प्रेम तिथे विरह आहेच, तरी प्रत्येक नात्याला मान देणारा रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!

संघशक्तीत किती ताकद असते सिद्ध करणार्‍या आणि हे वानरसेना घेऊन रावणावर विजय मिळवणार्‍या कर्तृत्त्ववान रामरायच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!

पिता जसा कर्तृत्त्ववान, मुलंही तशीच प्रतिभावान, असे रघुकुलतिलक रामचंद्र जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!