पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:25 IST2025-09-08T17:20:04+5:302025-09-08T17:25:22+5:30
Pitru Paksha 2025: यंदा ८ ते २१ सप्टेंबर रोजी पितृपक्ष(Pitru Paksha 2025) आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत चार ग्रहांचे गोचर होणार होते. त्याचा प्रभाव १२ ही राशींवर दिसून येईल, मात्र लाभ मिळणार आहे तो ७ राशींना! जाणून घेऊ हे लाभ कोणते आणि कोणाच्या वाट्याला येणार...

पितृपक्षात सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र यांचे गोचर होणार आहे. गोचर अर्थात स्थानबदल. ग्रहांची हालचार मनुष्य जीवनावर सकारात्मक, नकारात्मक परिणाम करते. अशा वेळी पितरांच्या आशीर्वादाने आणि ग्रहांच्या स्थलांतरणामुळे पुढीलपैकी ७ राशींना लाभ होणार असल्याचे संकेत ज्योतिषांनी वर्तवले आहेत.
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदान ठरणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल. या काळात तुम्हाला जीवनात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे.
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी हा संमिश्र काळ असेल. कासव गतीने का होईना नोकरी, व्यवसायात प्रगती कराल. गुंतवणुकीसाठी हा काळ लाभदायी ठरेल. दिवाळीत त्याचे पडसाद दिसतील. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. पितरांच्या आशीर्वादाने जुने व्यवहार मार्गी लागतील, अडलेली कामे पूर्ण होतील. सहकाऱ्यांशी सबुरीने वागा, राग, भांडण यापासून दूर राहा.
मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम देणारा हा काळ ठरेल. आर्थिक लाभ होतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होईल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात तुमची प्रगती होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
कर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी हा आनंदाचं काळ असेल. घर असो वा नोकरी, तुमच्या कामाचे कौतुक होईल. जुनी येणी वसूल होतील. वादविवाद टाळा. एकोप्याने राहिल्यास लाभ राहील. काही बाबतीत नमते घ्यावे लागेल. नाराज होऊ नका. भविष्य उज्ज्वल होईल. श्रध्दा, सबुरी महत्त्वाची. पितरांच्या कृपेने मातुल घराण्यातून धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह: सिंह राशीच्या लोकांना या काळात जोडीदाराची चांगली साथ लाभेल. आयुष्यात काही अडचणी असतील तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. आर्थिक घडी बसायला वेळ लागेल, पण उत्पन्नाचे नवीन साधन मिळाल्याने तुम्हाला आनंदच होईल. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. आईच्या आरोग्याची काळजी लागून राहील.
कन्या- पितृपक्ष कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा राहील. आर्थिक लाभ होतील, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. नशीब तुमच्या बाजूने पूर्णपणे राहील. हा काळ तुमच्यासाठी वरदानासारखा आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला खूप आदर मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता देखील असेल. विवाहेच्छुकांना चांगले स्थळ चालून येईल.
तूळ: तूळ राशीच्या लोकांसाठी पितृपक्षाचा काळ भरघोस यश देणारा आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. नवीन प्रोजेक्ट किंवा नवा उपक्रम राबवण्यात यशस्वी व्हाल. आपलेच म्हणणे खरे न ठरवता लोकांच्याही मनाचा कौल घ्या. नेतृत्त्वाचे गुण तुम्हाला लोकप्रियता मिळवून देईल. आर्थिक बाबतीत दुर्लक्ष करू नका. तीर्थक्षेत्री जाण्याचे आयोजन कराल.
वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांना पितृपक्षात चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ होतील, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. आदर, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरी आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना शुभ परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमच्या कामाची प्रशंसा करेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल.
धनु: धनु राशीच्या लोकांसाठी पितृपक्षाचा काळ इतरांच्या तुलनेत कमी वेगवान असेल. प्रगती होत राहील, पण कासवाच्या गतीने. या काळात आरोग्य संभाळण्याला प्राधान्य द्या. आर्थिक व्यवहार जपून करा. अतिरिक्त खर्च टाळणे सध्या तरी उत्तमच! वडिलोपार्जित जमिनीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ झाल्यामुळे हा काळ संस्मरणीय ठरेल.
मकर: मकर राशीसाठी पितृपक्षाचा काळ आजवर केलेल्या पुण्यकर्माचे चांगले फळ देणारा ठरेल. पितरांच्या आशीर्वादाने तुमची इच्छापूर्ती होईल आणि करिअरमध्ये तुम्हाला सूर्यासारखे तेज, झळाळी मिळेल. अनेक गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला मौन ठेवणे फायद्याचे राहील. आर्थिक प्रगतीचा हा काळ गृहसौख्यही देणारा असेल.
कुंभ: कुंभ राशीसाठी हे पंधरा दिवस संमिश्र फलदायी ठरतील. आनंदाच्या भरात वाहवत न जाता प्रत्येक परिस्थिती तटस्थपणे हाताळा. पितरांच्या आठवणीने हळवे व्हाल. मात्र त्यांचीच एखादी गोष्ट तुम्हाला प्रेरणादयी ठरेल. आर्थिक बाबतीत प्रगती नाही, पण टंचाईदेखील जाणवणार नाही. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळेल.
मीन: मीन राशीसाठी पितृपक्षाचा काळ आठवणींचा असेल. प्रियजनांच्या आठवणीने मन व्याकुळ होईल. मात्र उदास मन नैराश्यात जाणार नाही याची काळजी घ्या. कामात गुंतवून घ्या. एखादी गोड बातमी तुम्हाला ऊर्जा देईल. आर्थिक बाबतीत कोणतेही व्यवहार डोळसपणे करा. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने नव्या क्षेत्रात पदार्पण करण्याची इच्छा पूर्ण होईल.