महिनाभर दिवाळी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ ६ राशींना अपार लाभ; शुभ योगांचा समृद्धी काळ, पैसाच पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 01:23 PM2022-09-29T13:23:16+5:302022-09-29T13:29:27+5:30

आगामी ऑक्टोबर महिना काही राशींसाठी अतिशय शुभ-लाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या...

ज्योतिषीय दृष्टिकोनातून ऑक्टोबरचा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात बुध आणि शनी यांसारखे महत्त्वाचे ग्रह मार्गी होणार आहेत. याशिवाय एकूण ५ ग्रहांच्या स्थानात बदल पाहायला मिळणार आहेत.

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ०२ ऑक्टोबर रोजी कन्या राशीत मार्गी होईल. तसेच २६ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ १६ ऑक्टोबर रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल.

यानंतर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. १६ नोव्हेंबरपर्यंत सूर्य तूळ राशीत असेल. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला तूळ संक्रांत असेही म्हटले जाते. शुक्र कन्या राशीतून १८ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी २६ ऑक्टोबर रोजी आपलेच स्वामीत्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणार आहे. यापूर्वी कुंभ राशीतून वक्री चलनाने शनी मकर राशीत विराजमान झाला होता. ऑक्टोबर महिना हा अनेकार्थाने विशेष ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी यांसह महत्त्वाचे सण या महिन्यात साजरे होत आहेत. यावेळी धनत्रयोदशीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत, जे काही राशींसाठी फायदेशीर मानले जातात. ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कसा असेल, कोणत्या राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतील, जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यात नव्या गोष्टींची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तुम्ही भाग्याची उत्तम साथ लाभेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतील. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या निर्णयांचे काळजीपूर्वक मूल्यमापन करणे उपयुक्त ठरू शकेल. विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. जोडीदाराची साथ मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरचा महिना अनुकूल ठरू शकेल. नवीन घर घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊ शकेल. व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती करिअरमध्ये प्रगती करू शकतील. जनसंपर्क वाढवला, तर करिअरच्या नवीन संधी निर्माण करण्यात उपयुक्त ठरू शकेल. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्यापैकी काहींना जोडीदाराच्या कौटुंबिक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक लाभ मिळू शकतो.

सिंह राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिना सकारात्मक ठरू शकेल. व्यावसायिकांचे काम चांगले होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. जुगार किंवा आर्थिक सट्टा टाळा. त्याऐवजी दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करा. तुमची सर्जनशीलता सुधारेल. तणाव दूर करण्यासाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकाल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. भावंडांच्या सहकार्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरचा महिना चांगला ठरू शकेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांची अप्रत्यक्षरित्या मदत होऊ शकेल. व्यावसायिकांना नवीन करारांतून चांगला लाभ प्राप्त होऊ शकेल. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. याशिवाय जुन्या गुंतवणुकीतूनही नफा होऊ शकेल. आगामी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा कल असेल. तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरचा महिना यशकारक ठरू शकेल. तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित प्रकल्पाचे नेतृत्व करू शकता. तुमचा प्रभाव इतरांवर पडू शकेल. तुमच्यापैकी जे मार्केटिंग, सेल्स, रायटिंग आणि रिक्रूटमेंट या क्षेत्रात काम करत आहेत ते तुमच्या करिअरमध्ये अभूतपूर्व यश मिळवू शकतात. कुटुंब आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल.

मीन राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरचा महिना लाभदायक ठरू शकेल. तुम्ही जीवनात योग्य निर्णय घेऊ शकाल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुमच्या व्यवसायात नफा, नाव आणि प्रसिद्धी मिळू शकेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकेल. ऑफिसच्या कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकेल. मागील कोणत्याही गुंतवणुकीतून भरीव परतावा मिळू शकेल. तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक ध्येय साध्य करू शकतील.

ऑक्टोबर महिन्यातही बुधादित्य योग, लक्ष्मी नारायण योग, त्रिग्रही योग असे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. याचाही शुभ-लाभ प्राप्त होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.