Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:14 IST2026-01-07T11:07:17+5:302026-01-07T11:14:13+5:30

Numerology: 'जोड्या स्वर्गात बनतात' हा डायलॉग आपण अनेकदा सिनेमात ऐकला असेल. पण त्या जुळवल्या जात असताना त्यामागे काय कारण असते ते अंकशास्त्राच्या नजरेतून पाहू आणि आपल्या जोडीदाराचे आपल्या आयुष्यात येणे कोणत्या हेतूने झाले आहे तेही जाणून घेऊ.

अंकशास्त्रानुसार (Numerology) प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा केवळ त्याचे स्वभाववैशिष्ट्य सांगत नाही, तर तो इतरांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणणार आहे, हे देखील सुचवतो. या लेखात आपण तुमच्या जोडीदाराचे तुमच्या आयुष्यात येण्याचे प्रयोजन जाणून घेऊ.

तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात 'नेतृत्व आणि आत्मविश्वास' घेऊन आला आहे. जर तुम्ही स्वभावाने लाजाळू किंवा साशंक असाल, तर हा जोडीदार तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला आणि जगात आपली ओळख निर्माण करायला शिकवेल. तुम्हाला आयुष्यात 'नंबर वन' बनवण्यासाठी प्रेरणा देणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो.

हा जोडीदार तुमच्या आयुष्यात 'प्रेम, सहकार्य आणि भावनिक स्थैर्य' घेऊन आला आहे. गोंधळलेल्या आयुष्यात शांती कशी मिळवायची आणि नातेसंबंध कसे जपायचे, हे ते तुम्हाला शिकवतात. तुमच्या आयुष्यातील तणाव कमी करून तिथे संवेदनशीलतेची पखरण करणे, हा त्यांचा हेतू असतो.

तुमच्या आयुष्यात 'ज्ञान आणि विस्तार' आणणे हा या जोडीदाराचा उद्देश आहे. हे जोडीदार तुम्हाला हसवायला, मोकळेपणाने जगायला आणि सतत काहीतरी नवीन शिकायला प्रोत्साहित करतात. तुमच्या आयुष्यातील कंटाळवाणा काळ दूर करून तिथे ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी ते आले आहेत.

हा जोडीदार तुमच्या आयुष्यात 'शिस्त आणि पायाभरणी' करण्यासाठी आला आहे. जर तुमचे आयुष्य विस्कळीत असेल, तर हे जोडीदार तुम्हाला नियोजनाचे महत्त्व शिकवतील. आयुष्याला एक ठोस आकार देणे आणि कष्टाची फळे कशी चाखायची, हे शिकवण्यासाठी त्यांचा प्रवेश तुमच्या आयुष्यात झाला आहे.

तुमच्या आयुष्यात 'एडव्हेंचर, बदल आणि उत्साह' घेऊन येणे हा यांचा मूळ हेतू आहे. एकाच साच्यात अडकलेल्या तुमच्या आयुष्याला गती देणे आणि 'जगणे' म्हणजे काय असते, याची प्रचिती करून देणे, यासाठी ते तुमच्या आयुष्यात आले आहेत. ते तुम्हाला बंधने झुगारून मुक्त व्हायला शिकवतात.

हा जोडीदार तुमच्या आयुष्यात 'जबाबदारी, सौंदर्य आणि निस्वार्थ प्रेम' घेऊन आला आहे. घर कसे सजवायचे आणि कुटुंबाला एका धाग्यात कसे बांधायचे, हे ते तुम्हाला शिकवतात. तुम्हाला आयुष्यातील सुखाचा आणि लक्झरीचा आस्वाद मिळवून देणे, हा त्यांचा हेतू असतो.

तुमच्या आयुष्यात 'अध्यात्म आणि आत्मचिंतन' घेऊन येणे हा या जोडीदाराचा उद्देश आहे. ते तुम्हाला केवळ बाह्य सुखाच्या मागे न धावता, स्वतःच्या आत डोकावायला शिकवतात. आयुष्यातील गुढ गोष्टींचा उलगडा करणे आणि सत्याची ओळख करून देणे, यासाठी ते तुमच्या सोबत आहेत.

हा जोडीदार तुमच्या आयुष्यात 'सत्ता, पैसा आणि कर्म' यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आला आहे. व्यावहारिक जगात यश कसे मिळवायचे आणि मोठी स्वप्ने कशी पूर्ण करायची, याचे धडे ते तुम्हाला देतात. तुमच्या आयुष्यातील आर्थिक बाजू मजबूत करणे, हा त्यांचा मोठा हेतू असतो.

तुमच्या आयुष्यात 'माणुसकी, त्याग आणि पूर्णता' घेऊन येणे हा या जोडीदाराचा हेतू आहे. समाजासाठी काहीतरी करणे आणि जगाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन देणे, हे ते तुम्हाला शिकवतात. एक योद्धा बनून संकटांशी कसे लढायचे, ही प्रेरणा ते तुम्हाला देतात.