Numerology: ‘या’ ६ मूलांकांना सर्वोत्तम, येणी वसूल होतील; सरकारी नोकरीचे योग, महिनाभर लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 03:03 PM2023-10-01T15:03:03+5:302023-10-01T15:03:03+5:30

Numerology: ६ ग्रहांचा शुभ प्रभाव ६ मूलांकांवर असल्याचे आगामी काळात पाहायला मिळू शकते. लकी ६ मूलांक कोणते? जाणून घ्या...

Numerology: ऑक्टोबर महिन्यात नवग्रहांपैकी ६ ग्रहांचे गोचर होणार आहे. बुध सुरुवातीला कन्या आणि नंतर तूळ राशीत प्रवेश करेल. मंगळ तूळ राशीत विराजमान होईल. सूर्याचे कन्या राशीतून गोचर संपून तूळ संक्रांती सुरू होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छाया आणि क्रूर ग्रह मानले गेलेले राहु तसेच केतु ऑक्टोबर अखेरीस वक्री चलनाने अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील.

या सहा ग्रहांचा गोचराचा राशींवर जसा प्रभाव पडेल, तसाच तो मूलांकांवरही पडू शकेल. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.

ऑक्टोबरची सुरुवात पितृपक्षाने होत आहे. तर मध्यावर घटस्थापना नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. त्यानंतर दसरा साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असणार आहे. या सर्व ग्रहस्थितीचा विचार केल्यास कोणत्या मूलांकांना ऑक्टोबर महिन्याचा काळ अतिशय उत्तम, लाभदायक, विविध आघाड्यांवर शुभ-फलदायी ठरू शकेल? पाहुया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. कामानिमित्त केलेल्या प्रवासाचे शुभ परिणामही मिळतील. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी निर्माण होतील. ध्येय पूर्ण करू शकाल. नवीन वाहन घ्यायचे असेल तर थांबा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. गुंतवणुकीतून आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबातील सर्व सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अनेक कामे पूर्ण होतील. प्रेम जीवनात परस्पर प्रेम वाढेल. उत्साहात दिवस जाऊ शकतील.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. मान-सन्मानात चांगली वाढ होईल. धार्मिक कार्यात रस वाढू शकेल. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार राहाल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. व्यावहारिक कौशल्याने हाती घेतलेली कामे यशस्वी करू शकाल. आर्थिक आघाडीवरील प्रयत्न भविष्यात वाढीव संपत्तीची संधी देतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते. घरात चांगले वातावरण निर्माण होईल. विवाहितांसाठी संमिश्र काळ. परस्पर प्रेम राहील. प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. आगामी काळ शुभ राहील. आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल. भागीदारीत केलेली गुंतवणूक शुभ परिणाम देईल. नोकरदारांना काही कार्यालयीन कामांमुळे प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिकांसाठी फायदेशीर कालावधी ठरू शकेल. व्यवसाय विस्तारासाठी योजना आखतील. मुलांचे मन अभ्यासात केंद्रित राहील, त्यामुळे पालक आनंदी राहतील. एखाद्या खास मित्राची भेट होऊ शकते.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतील प्रगती पाहून दिलासा मिळेल. नोकरदार उत्पन्न वाढवण्यासाठी दुसर्‍या कंपनीत जाण्याचा विचार करू शकतात. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, त्यातून चांगला नफा मिळू शकेल. काही कामानिमित्त धावपळ करावी लागू शकते. जीवनात आनंद आणि सुसंवाद होईल. काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. वैयक्तिक विकास होऊ शकेल. नोकरदारांनी स्वतःच्या कामांवर लक्ष द्यावे. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे. व्यावसायिकांसाठी आगामी काळ उत्तम राहील. चांगली कामगिरी करून नफा कमावता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर हा महिना चढ-उतारांनी भरलेला असेल पण परिस्थिती नियंत्रणात राहील. शिस्तीने जीवनात आनंद आणि समृद्धी प्राप्त करू शकाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. यशाचा मार्ग मोकळा होईल. प्रगतीच्या शुभ संधी मिळतील. सर्जनशील कार्यातून अधिक यश मिळेल. सन्मान वाढेल. पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकाल. पुरेशी रक्कम वाचवण्यात यश मिळू शकेल. करिअरमध्ये स्थिरता अनुभवाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. खूप व्यस्त असाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. भावंडांच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण कराल. एखाद्याचे बोलणे मनाला लागू शकते. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरदारांना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी बदलण्याचा विचार असल्यास थोडे थांबा. कोणतीही नवीन गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळ लाभ देईल. नवीन मित्र बनवाल आणि कुठेतरी बाहेर जाऊ शकता.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. पण सावध राहावे लागेल. कोणतेही मोठे व्यवहार करू नका, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. मुलांसाठी काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी कराल. नोकरदार आणि व्यावसायिक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील. आर्थिक लाभाची परिस्थितीही निर्माण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. एखाद्या अफवेमुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. जवळच्या व्यक्ती विश्वासघात करू शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. धनलाभाच्या शुभ संधी निर्माण होतील. जितके त्वरित निर्णय घ्याल, गुंतवणूक कराल, तितके जास्त पैसे मिळतील. प्रेम जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. भावंडे, मित्र यांचे सहकार्य मोलाचे ठरू शकेल. वाहन जपून चालवा. नोकरदारांचे अधिकार वाढू शकतात. व्यापारी यशोझेप घेऊन प्रगती करतील. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.