नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 20:41 IST2025-07-04T20:31:13+5:302025-07-04T20:41:15+5:30

चातुर्मासारंभ कोणत्या राशींना शुभ-लाभाचा ठरू शकेल? जाणून घ्या...

आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत आहे. यानंतर आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. यंदा गुरुवारी गुरुपौर्णिमा आल्याने तिचे महत्त्व वाढले आहे. देवशयनी एकादशीला श्रीविष्णू झोपी जातात, अशी मान्यता आहे. या काळात महादेव शिवशंकर या सृष्टीचे पालन करतात, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, या आगामी काही दिवसांत शुक्र आणि चंद्र यांचा नीचभंग योग जुळून येत आहे. तर शुक्र आणि गुरु यांचा दशांक योग जुळून येत आहे. शुक्र आणि गुरु एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. असे असले तरी या ग्रहांच्या योगाचा अनेक राशींना फायदा होऊ शकतो. तसेच शनि आणि शुक्राचाही शुभ योग जुळून येत आहे.

सूर्याचा गुरुच्या नक्षत्रात होत असलेला प्रवेश काही राशींना उत्तम ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. एकंदरीत चातुर्मासारंभ कोणत्या राशींना शुभ-लाभाचा ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर सकारात्मकता लाभू शकते. व्यावसायात यश मिळू शकेल. एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी मदतीची आवश्यकता असेल तर अजिबात संकोच करू नका, मदत घेणे शहाणपणाचे ठरू शकेल. वेळेवर निर्णय घेणे हिताचे ठरू शकेल. मेहनतीचे फळ मिळू शकेल.

वृषभ: दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. उत्पन्न वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांना फायदे मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. यासोबतच, पदोन्नती, पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, बराच काळ अडकलेला करार पूर्ण होऊ शकतो. या काळात गुंतवणूक केल्याने चांगला नफा मिळू शकतो. भविष्यासाठी पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. नकारात्मकता दूर होऊ शकते.

कर्क: सोयी-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकाल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगल्या ऑफर मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी असलेला दबाव आता थोडा कमी होऊ शकतो. व्यवसायात नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल.

सिंह: शेअर बाजार आणि लॉटरीतून नफा मिळू शकतो. मित्र आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळू शकेल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प आणि भागीदारीतून फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील.

कन्या: नशिबाची साथ मिळू शकते. कुटुंब किंवा मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. कौटुंबिक समस्या संपू शकतात. चांगली कामगिरी मिळू शकता.

तूळ: नशिबाची साथ मिळू शकेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकते. योजना यशस्वी होतील. उच्च शिक्षण, संशोधन किंवा आध्यात्मिक कार्यात प्रगती होऊ शकेल. विरोधक पराभूत होऊ शकतील. प्रगती आणि सकारात्मक बदल घडू शकतात. आत्मविश्वास वाढेल. कठीण आव्हानांना धैर्याने तोंड द्याल. करिअरमध्ये यश मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहू शकेल.

वृश्चिक: यश आणि स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. कष्टाचे फळ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर हा काळ अनुकूल असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.

धनु: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकेल. व्यवसायात यश-प्रगती होऊ शकेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. भागीदारीतून नफा होऊ शकेल. वैवाहिक जीवन चांगले असू शकेल. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.