बुध गोचराचा शुभ प्रभाव: ‘या’ ९ राशी लकी, गुंतवणुकीतून धनलाभाचे योग; पद-पैसा वृद्धीचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:13 PM2023-02-06T13:13:28+5:302023-02-06T13:21:17+5:30

कोणत्या राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकेल? कार्यक्षेत्रात यश, प्रगती होऊ शकेल? जाणून घ्या...

फेब्रुवारीचा महिना विशेष ठरणारा आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय दृष्टीने या महिन्यात अनेक शुभ योग जुळून येत आहेत. ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार केल्यास नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध या महिन्यात दोन वेळा रास बदलणार आहे. आताच्या घडीला बुध धनु राशीत विराजमान आहे.

०७ फेब्रुवारी रोजी बुध धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. आताच्या घडीला मकर राशीत नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य विराजमान आहे. बुधच्या मकर प्रवेशानंतर सूर्य आणि बुध युतीचा शुभ मानला गेलेला बुधादित्य योग जुळून येत आहे. यानंतर या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल.

बुधचे हे गोचर आगामी काळात काही राशींसाठी लाभदायक ठरू शकणार आहे. आगामी काळ आर्थिक आघाडी, करिअर, गुंतवणूक, नोकरी, कार्यक्षेत्र यांमध्ये काही राशींना शुभ फलदायी ठरू शकेल. तर काही राशींना आगामी काळ सावधगिरी बाळण्याचा आहे. कोणत्या राशींना हा काळ फायदेशीर ठरू शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प अनुकूल परिणाम देईल. कार्यक्षेत्रातील काही नवीन प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतील. व्यावहारिक राहून घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतील. आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीच्या माध्यमातून शुभ संधी मिळतील. व्यावसायिकांना प्रवासात यश मिळेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळात चांगली बातमी मिळू शकेल. एखाद्या चांगल्या क्षेत्रात नवीन प्रोजेक्ट फायदेशीर ठरू शकतील. व्यापारी वर्गाला संमिश्र अनुभव येतील. कार्यक्षेत्रात काही कामांमुळे समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाने कामावर लक्ष केंद्रीत करणे उपयुक्त ठरू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. व्यावसायिकांना प्रवासातून लाभ मिळू शकतात. बिझनेसमध्ये काही योजना यशस्वी होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीची मदत मोलाची ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवणे लाभदायक ठरू शकते.

कर्क राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आनंददायी जाऊ शकेल. कार्यक्षेत्रात यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. मात्र, आगामी काळात खर्चाचे प्रमाण वाढू शकते. खर्चांवर नियंत्रण ठेवावे. बजेट तयार करून त्यानुसार खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रीत करावे.

सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. आर्थिक लाभाचे योग जुळून येऊ शकतील. उत्पन्नही वाढेल. उत्पन्नातील वाढीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवयासिक प्रवासात काही समस्या येऊ शकतात. मात्र, त्यावर मात करू शकाल. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल.

कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ यशकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. एखादा चांगला प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभासाठी शुभ परिस्थिती निर्माण होत असून दोन गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल.

तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी चांगला ठरू शकेल. आर्थिक बाबतीत आगामी काळ शुभ राहील. आर्थिक लाभासाठी चांगली परिस्थिती निर्माण होत राहील. वडिलधाऱ्या व्यक्तीचे मत किंवा त्यांचे सहकार्य तुमची संपत्ती वाढवण्यास उपयुक्त ठरेल. व्यवसायिक प्रवास अनुकूल परिणाम देऊ शकतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. कठोर परिश्रमातून प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकते. एखाद्या व्यक्तीची मदत मोलाची ठरू शकेल. आर्थिक बाबतीत वास्तववादी असणे तुमच्या हिताचे असेल.

धनु राशीच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. पैसे मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. विशेषत: गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. चांगली बातमी मिळू शकते.

मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. गुंतवणुकीच्या बाबतीत व्यस्त राहाल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी संयम राखण्याची गरज आहे, अन्यथा त्रास वाढू शकतो.

कुंभ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकतो. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. चातुर्याने कामे वेळेत पूर्ण करू शकाल. गुंतवणुकीकडे लक्ष दिले, तर फायदा होऊ शकेल. थोडी जोखीम पत्करून गुंतवणूक करावी लागेल. एखादी भेटवस्तू मिळू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. विरोधकही तुमच्या मताचा आदर करतील. प्रवासात शुभ परिणाम मिळतील. यश, प्रगती साध्य होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.