आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी

Sanjiv Goenka Hugs KL Rahul : संजीव गोएंका मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 06:39 PM2024-05-14T18:39:10+5:302024-05-14T18:41:40+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2024 updates lucknow super giants team owner Sanjiv Goenka Hugs captain KL Rahul | आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी

आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KL Rahul-Sanjiv Goenka Meeting : लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचे मालक संजीव गोएंका मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात लखनौच्या संघाला दारूण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संतापलेल्या गोएंका यांनी कर्णधार लोकेश राहुलला धारेवर धरले. त्यांनी भरमैदानात सर्वांसमोर राहुलला सुनावल्याचे पाहायला मिळाले. पण, आता या वादावर पडदा पडल्याचे दिसते. कारण संजीव गोएंका आणि राहुल यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. संजीव गोयंका यांनी राहुलला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एका डिनर पार्टीला आमंत्रित केल्याचे कळते. 

हैदरबादकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर गोएंकांनी आपल्या संघाच्या कर्णधारावर राग काढला. त्यांचे हावभाव सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त करताना गोएंका यांना लक्ष्य केले. अनेक माजी खेळाडूंनीही या घटनेचा दाखला देत नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही आपली प्रतिक्रिया देताना गोएंकावर कडक शब्दांत टीका केली. 

संजीव गोएंका आणि लोकेश राहुल या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अनेक अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाची लढत होत आहे. आजचा सामना दोन्हीही संघासाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे. खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या लखनौच्या संघासमोर रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीचे आव्हान आहे. मागील सामन्याला मुकलेला पंत आज मैदानात दिसेल. दिल्ली कॅपिटल्सला देखील प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आज विजय मिळवणे आवश्यक आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ६४ वा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. 

Web Title: ipl 2024 updates lucknow super giants team owner Sanjiv Goenka Hugs captain KL Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.