Mars In Sagittarius 2022: मंगळाचा धनु प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ, धनलाभ, अन् मंगलमय काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:59 AM2022-01-16T11:59:08+5:302022-01-16T12:02:44+5:30

Mars In Sagittarius 2022: मंगळाचा राशीबदल फारसा सकारात्मक नसला तरी काही राशीच्या व्यक्तींना हा लाभप्रद ठरू शकतो. जाणून घ्या...

सन २०२२ हे वर्ष सुरू झाल्यानंतर नवग्रहांचा राजा सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केल्यानंतर आता नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. १६ जानेवारी रोजी हे राशीपरिवर्तन होणार आहे. (Mars In Sagittarius 2022)

मंगळ ग्रहाच्या धनु राशीतील प्रवेशाचा हवामान, राजकारण या क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच काही अपघात, अप्रिय घटना घडू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मात्र, मंगळ ग्रहाचे हे राशीपरिवर्तन काही राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ फलदायक, लाभप्रद, धनप्राप्ती करून देणारे ठरू शकते. कोणत्या राशीच्या व्यक्तीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाचा हा राशीबदलाचा काळ मंगलमय ठरू शकतो, ते जाणून घेऊया...

मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींना भाग्योदयकारक ठरू शकते. मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. गेल्या अनेक कालावधीपासून प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतील. कार्यक्षेत्रात यश व प्रगती साध्य करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी उत्तम ठरू शकतो. विज्ञान, कृषी तसेच गूढ विद्या यांसारख्या विषयांचे कुतूहल वाढू शकते.

मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना सुखद ठरू शकते. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतात. घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. नोकरीत नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. मात्र, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, असा सल्ला दिला जात आहे. वादविवादात विजय मिळवू शकाल.

मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी पराक्रमात वाढ करणारे ठरू शकते. समस्या, अडचणी दूर होऊ शकतात. आत्मविश्वासाने काम करू शकाल. भावंडांशी असलेले नाते दृढ होऊ शकेल. कार्यक्षेत्रात कामाची गती वाढू शकेल. वरिष्ठ अधिकारी कामाची प्रशंसा करतील. चांगले पाठबळ मिळू शकेल. मात्र, अतिउत्साहीपणाला आवर घालावा, असा सल्ला दिला जात आहे.

मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल. आर्थिक पक्ष मजबूत होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायक सिद्ध होऊ शकते. कार्यक्षेत्रात अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतात. नोकरीत मनाप्रमाणे बदलीचे योग जुळून येऊ शकतात. वडिलोपार्जित व्यवसाय, उद्योगात आर्थिक प्रगती साध्य करू शकाल. नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. मंगळाचा राशीबदल यश व प्रगती साध्य करू शकणारा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशीपरिवर्तन काहीसे संमिश्र ठरू शकते, असे म्हटले जात आहे.