March Astro 2025: मार्च अविस्मरणीय ठरणार, 'या' राशींवर शनीची कृपा होणार; नव्या संधीसाठी व्हा सज्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:01 IST2025-03-04T15:56:58+5:302025-03-04T16:01:01+5:30
March Astro 2025: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून मार्च २०२५ हा महिना खूप खास आहे. या महिन्यात वर्षातील सर्वात मोठे ग्रह संक्रमण या काळात घडणार आहे, ज्यामुळे अनेक लोकांचे जीवन क्षणार्धात बदलेल.

या महिन्यात बुध, सूर्य आणि शुक्र हे ग्रह आपली राशी बदलतील पण शनि सर्वात मोठा बदल घडवून आणेल. अडीच वर्षांनी म्हणजे मार्चच्या अखेरीस शनि आपली राशी बदलेल. शनि मीन राशीत प्रवेश करेल आणि ५ राशीच्या लोकांचे भाग्य बदलेल. या राशीचे लोक केवळ श्रीमंतच होणार असे नाही, तर त्यांची अनेक स्वप्ने पूर्ण होतील, त्यांच्या आयुष्याला नवे वळण प्राप्त होईल.
वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी ही चांगल्या आयुष्याची सुरुवात ठरेल. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्याल, ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.
कन्या :
कन्या राशीच्या लोकांना आता भाग्याची साथ मिळू लागेल. आर्थिक बळ मिळेल. तुमच्या योजनेनुसार काम पूर्ण होताना दिसू लागल्याने तुम्ही आनंदी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी काही सकारात्मक बदल घडू शकतात ज्यामुळे नेत्रदीपक यश मिळू शकते.
कर्क :
कर्क राशीच्या लोकांची प्रमोशनची प्रतीक्षा संपुष्टात येईल. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होईल. काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक प्रश्न दूर होऊन आयुष्याचा रथ वेग घेईल.
कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीच्या द्वितीय चरणातून शनि संक्रमणामुळे दिलासा मिळेल. तुमच्या अनेक समस्या आपोआप दूर होऊ लागतील. मान-प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. मित्रपरिवाराकडून तुम्हाला फायदा होईल. हा काळ तुम्हाला विविध क्षेत्रात मान सन्मान देणारा ठरेल.