Numerology: चंद्रग्रहण प्रभाव: ‘या’ ६ मूलांकांना मिळेल उत्तम फायदा; धनलाभाचे योग, सुखाचा आनंददायी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 05:16 PM2022-11-07T17:16:23+5:302022-11-07T17:22:02+5:30

Numerology: तुमचा मूलांक कोणता? तुमच्या मूलांकावर चंद्रग्रहणाचा प्रभाव कसा असू शकेल? जाणून घ्या...

कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार असून, ते खग्रास पद्धतीने भारतात दिसणार आहे. ऐन दिवाळीत सूर्यग्रहण झाले होते. आता तुळशी विवाहाला चंद्रग्रहण होत आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. हे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. चंद्रग्रहणाची सुरुवात म्हणजेच ग्रहणस्पर्श भारतात दिसणार नाही, तर चंद्रग्रहणाचा मोक्ष दिसेल. (lunar eclipse november 2022 numerology)

ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचा ग्रहणस्पर्श दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटे असून, ग्रहण मध्य दुपारी ४ वाजून ३० मिनिटे आणि मोक्ष सांयकाळी ६ वाजून १९ मिनिटे आहे. या चंद्रग्रहणाला २०० वर्षांनंतर दोन प्रतिकूल योगही तयार होत आहेत.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. तसेच या चंद्रग्रहणाचा काही राशींप्रमाणे काही मूलांकावर शुभ प्रभाव पडेल, चांगले लाभ होऊ शकतील, असे सांगितले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकते. जितक्या जलद समस्या तुमच्यासमोर येतील, तितक्या लवकर त्या समस्या सोडवल्या जातील. नव्या प्रेमसंबंधांची सुरुवात शक्य आहे. सुरुवातीच्या द्वंद्वानंतर व्यावसायिक निर्णय योग्य वाटतील.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकते. तुमच्या कठोर बोलण्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. मित्रांसोबत काही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात. कॉस्मेटिक, केमिकल आणि सॉफ्टवेअरशी संबंधित लोकांसाठी अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण अनुकूल ठरू शकते. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. पूजा आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुमच्याशी जोडलेल्या मित्रांकडून तुम्हाला अचानक काही चांगली बातमी ऐकू येईल. जोडीदाराच्या मदतीने कोणतीही प्रलंबित योजना पूर्ण होऊ शकते.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण उत्तम ठरू शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. तुम्हाला भौतिक सुखाचा आनंद घेता येऊ शकेल. वैवाहिक जीवन अतिशय सुसंवादाने पुढे जाईल. घरातील वातावरणही आनंददायी राहील. कामाच्या ठिकाणी मानसिक दडपण असेल, परंतु त्याचवेळी प्रशंसा होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. घरगुती वातावरणावर काहीसा परिणाम होऊ शकतो. शक्य तितके वादांपासून स्वतःला दूर ठेवा. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा काळ आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. शंका टाळा.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण यशकारक ठरू शकेल. संपूर्ण कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल आणि मैत्रीही मजबूत होईल. व्यवसायाच्या दृष्टीनेही हा काळ उत्तम राहील. जुनी देयके मिळाल्याने मन खूप शांत राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण अनुकूल ठरू शकेल. मनामध्ये समाधानाची भावना राहील. काम करण्याचे तंत्र उत्तम होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. पण कामाचा ताणही जास्त असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रवास केल्याने लाभ होऊ शकतो.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण सामान्य ठरू शकेल. चिडचिड होऊ देऊ नका. अन्यथा वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर्क-वितर्क लढवू नका. आर्थिक समस्या सुटत राहतील आणि तुमची सर्व कामेही पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. या मूलांकासाठी चंद्रग्रहण चांगले ठरू शकेल. प्रयत्न वाढवावे लागतील. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून लाभ मिळू शकतील. नोकरदारांचे कौतुक होऊ शकेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे मिळतील. तसेच विवाहाची बोलणी अंतिम टप्प्यात जाऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.