१०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:09 PM2024-03-14T12:09:23+5:302024-03-14T12:18:26+5:30

कधी आहे होळी? अनेक शुभ योगातील चंद्रग्रहणाचा ८ राशींना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

मराठी वर्षाच्या सांगतेला येणारा मोठा सण म्हणजे होळी. मार्च महिन्यात होळी आहे. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. यंदा २४ मार्च २०२४ रोजी होळी म्हणजेच होलिका प्रदीपन असून, २५ मार्च रोजी धुलिवंदन आहे.

होळी हा मराठी वर्षातील शेवटचा सण. सन २०२४ रोजी होळीला चंद्रग्रहण लागणार आहे. मात्र, हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जाते. काही मान्यतांनुसार, होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हा योग १०० वर्षांनी जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे.

यंदा होळीच्या दिवशी अतिशय आश्चर्यकारक योगायोग घडत आहे. होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग जुळून येणार आहे. कुंभ राशीत शुक्र, मंगळ आणि शनि यांचा त्रिग्रही योग, तसेच मीन राशीत सूर्य आणि राहुचा युती योग आणि कन्या राशीत चंद्र-केतुचा युती योग जुळून येत आहे. होळी आणि चंद्रग्रहण कोणत्या राशींना उत्तम लाभ देणारे ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: धनलाभ होऊ शकतो. नफा मिळू शकतो. व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची प्रतीक्षा संपेल. यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. खर्च कमी होईल. करिअर आणि व्यवसायात अनुकूल परिणाम मिळतील. योजनांना गती मिळेल. अडकलेले पैसे मिळून काही रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत खूप फायदा होईल. आत्मविश्वास वाढेल.

वृषभ: परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल आणि बँक बॅलन्स वाढेल.

मिथुन: करिअर, बिझनेसच्या बाबतीत खूप पुढे घेऊन जाईल. संपत्ती वाढेल. यश मिळेल. जीवनात भौतिक सुखसोयी वाढू शकतील. चांगले उत्पन्न मिळवू शकाल.

कन्या: धन, समृद्धी आणि प्रगती मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांचे मोठे सौदे फायनल होऊ शकतात. पदोन्नती-वाढ मिळू शकते.

तूळ: अनेक मोठ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. नवीन कार, घर खरेदी करू शकता. जीवनात सुख-सुविधा मिळतील. इच्छित पद, पैसा, पदोन्नती मिळू शकते. मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. अनुकूल परिणाम मिळू शकतील. आदर वाढेल. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल.

धनु: मोठे लाभ मिळू शकतात. करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. इच्छित पद आणि पैसा मिळू शकेल. व्यवसायातही फायदा होईल. आरोग्य चांगले राहील.

मकर: जीवनात शुभ प्रभाव वाढू शकेल. संपत्ती वाढेल. नोकरीच्या बाबतीत, कुठून तरी कामाची माहिती मिळू शकते. आवडीच्या कोणत्याही ठिकाणी कामावर पाठवले जाऊ शकते. प्रगती होण्याची शक्यता आहे. परदेशातून व्यवसाय करतात, त्यांच्या कामात प्रगती होईल. नफा मिळेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराचा आणि मुलांचा पाठिंबा मिळेल.

कुंभ: प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. व्यक्तिमत्व खूप सुधारेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. घरात काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये उच्च झेप घ्याल. आतापर्यंत विरोधात असलेले मैत्री करण्याचा विचार करू लागतील.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.