Krishna Janmashtami 2025 Wishes: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Messages, WhatsApp Status ला शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:33 IST2025-08-14T17:05:44+5:302025-08-14T20:33:35+5:30
Krishna Janmashtami Marathi Wishes 2025: राम आणि कृष्ण हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत. कलियुगात राम होता येणे कठीण, म्हणून कृष्ण जास्त जवळचा. त्याच कृष्णाचा जन्मोत्सव(Janmashtami 2025) आपण १५ ऑगस्ट रोजी साजरा करणार आहोत. कृष्णावरचे आपले प्रेम या सुंदर मराठी शुभेच्छा संदेशातून शेअर करा आपल्या मित्रपरिवाराला.

कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे शांत हे आभाळ सारे शांत तारे, शांत वारे या झर्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे
कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदीआनंद झाला रास खेळू चला, रंग उधळू चला आला आला ग कान्हा आला
कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा
केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा
घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा
रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधनें चारिताहे ॥
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा
नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे
कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा
गोविंदा आला रे आला ज़रा मटकी संभाल बृजबाला