समस्या, संकट येऊ देत नाहीत, ४ राशींवर सदैव असते हनुमंतांची कृपा; सुख-समृद्धी-भरभराट लाभते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:11 IST2026-04-02T11:03:20+5:302026-04-02T11:11:25+5:30
हनुमंतांच्या काही अत्यंत प्रिय राशी आहेत, ज्यांवर सदैव वरदहस्त कायम असतो, असे म्हटले जाते. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

Hanuman Priya Rashi: बुद्धी, शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचा परम आदर्श असणाऱ्या मारुतीरायाचा जन्मोत्सव देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जातो. गुरुवार, ०२ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. हनुमान हा श्रीरामांचा निससीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. हनुमंत चिरंजीव मानले गेले आहेत.

हनुमंतांचे नुसते नाव घेतले तरी शक्ती संचारल्यासारखे वाटते. प्रभू श्रीरामांचे परमभक्त, शक्ती अन् सामर्थ्याचे दैवत मानल्या गेलेल्या हनुमान, बजरंगबलीचे देशभरात पूजन केले जाते. उत्तर भारतात हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे. तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात.

एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. अनेक प्रकारच्या आपत्तींच्या विनाशासाठी म्हणून हनुमंताची उपासना केली जाते. बलोपासना वाढविण्यासाठी, शरीर धष्टपुष्ट आणि चपळ होण्यासाठी मारुतीची उपासना आवश्यक आहे.

अशा काही राशी आहेत, ज्या राशींवर हनुमंतांचा सदैव वरदहस्त असतो, असे मानले जाते. या राशींना कधी कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. संकटे, समस्या दूर होतात. शनिचाही प्रतिकूल प्रभाव टिकत नाही, असे म्हटले जाते. कोणत्या राशी मारुतीरायाच्या प्रिय राशी आहेत? जाणून घेऊया...

मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. ही रास हनुमंतांची प्रिय रास असल्याचे मानले जाते. हनुमानाची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते, असे सांगितले जाते. अशा व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती, लक्ष्य केंद्रित करण्याची क्षमता असते. बजरंगबली त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असतात. कौशल्य, ज्ञान आणि चतुराईने पैसे कमवू शकतात. या राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानाचे पूजन करावे, असे केल्याने संकटे दूर होण्यास मदत मिळू शकते. सुख, सौभाग्य, ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. ही रास हनुमानाची प्रिय रास असल्याचे म्हटले जाते. मारुतीरायाची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते, असे सांगितले जाते. जीवनातील समस्यांपासून बजरंगबली संरक्षण करतात. हनुमानाच्या कृपेने पैशांचा ओघ सुरू राहतो. पैशाची कमतरता भासत नाही. या व्यक्ती करिअर आणि व्यवसायात प्रगती करू शकतात. या व्यक्तींना हनुमंतांच्या कृपेने विशेष लाभ होतो. नेतृत्व क्षमता वाढीस लागते, असे म्हटले जाते. हनुमानाचे पूजन केल्याने या राशीच्या लोकांच्या समस्या दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे.

वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींवर हनुमंतांची विशेष कृपा असते. हनुमानाच्या कृपेने या राशीचे लोक त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात. हनुमानाच्या कृपेने कामे यशस्वी होऊ शकतात. ती फलदायी ठरू शकतात. या लोकांना हनुमानाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. तसेच, आर्थिक स्त्रोतांच्या कमतरतेचा फटका बसत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

कुंभ: या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांवर विशेष हनुमंतांचा आशीर्वाद असतो. आताच्या घडीला कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. या राशीच्या व्यक्तींना हनुमान अतिरिक्त लाभ देतात. कामात भरघोस भरभराट करतात. अडथळ्यांपासून मुक्तता होऊ शकते. आनंदी, समृद्ध जीवन जगतात. आर्थिक स्थितीही अनुकूल असते. या राशीच्या व्यक्तींनी नियमितपणे हनुमानाची पूजा केली तर, शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















