गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींना यशच यश, लाभच लाभ; भरघोस भरभराट, धनलक्ष्मी-स्वामी शुभ करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:45 IST2025-03-19T07:31:58+5:302025-03-19T07:45:50+5:30
गुरुवारी अनेक राजयोग, शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशींना लक्ष्मी देवीसह दत्तगुरु स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊन सर्वोत्तम संधी, लाभ मिळू शकतील? जाणून घ्या...

आताच्या घडीला मीन राशीत अनेक ग्रह विराजमान आहेत. नवग्रहांचा राजा सूर्य, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध, शुक्र ग्रह आणि क्रूर छाया ग्रह मानला गेलेला राहु मीन राशीत विराजमान आहे. केतु कन्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे मीन राशीतील सर्व ग्रहांचा केतुशी समसप्तक योग जुळून येत आहे.
गुरुवारी गजकेसरी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सूर्य, बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग, बुधादित्य, शुक्रादित्य राजयोग, सूर्य आणि राहु यांचा ग्रहण योग जुळून येत आहे. गुरुवार हा दिवस दत्तगुरु, स्वामी समर्थ महाराज तसेच आराध्य गुरुंच्या पूजन, नामस्मरणासाठी विशेष मानला जातो.
गुरुवारी गुरुपूजन करण्यासह नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाशी संबंधित उपाय, मंत्र जप, दान-धर्म करणे शुभ मानले जाते. त्यामुळे गुरुबळ मिळू शकते. स्वामी दत्तगरुंचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते. कोणत्या राशींना शुभ फले प्राप्त होऊ शकतील, कोणत्या राशींना गुरुकृपा लाभू शकेल? जाणून घेऊया...
मेष: थोडी दगदग होईल. कार्यक्रमांचे नियोजन नीट करा. वेळापत्रकात थोडी ढील ठेवा. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. आर्थिक व्यवहार जपून करा. कुणाच्या सांगण्याने लगेच हुरळून जाऊ नका. गुरुवारी, शुक्रवारी महत्त्वाची कामे सावधपणे करा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शनिवारी अनेक अडचणी दूर होतील.
वृषभ: साधक बाधक अनुभव येतील. नोकरीत कामाचा ताण असला तरी प्रगतीला पूरक वातावरण राहील. काही विशिष्ट प्रकारचे लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळा. अनेक अडचणी दूर होतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वाहने जपून चालवा.
मिथुन: नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कामाचे बदललेले स्वरूप फायदेशीर ठरेल. अनपेक्षितपणे चांगली संधी चालून येईल. घरी पाहुणे मंडळी येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. समाजात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. गुरुवारी, शुक्रवारी चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण काही अडचणी उभ्या करेल. काही लोक तुमच्या विरोधात कारवाया करतील. शनिवारी अडचणी दूर होतील. जीवनसाथीशी वाद टाळा.
कर्क: इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. त्यामुळे थोडी मेहनत करावी लागेल. गुरुवारी, शुक्रवारी चंद्राचे पंचम स्थानातून होणारे भ्रमण आणि भाग्य स्थानातील रवी, बुध, शुक्र, राहु, नेपच्यून युतीमुळे सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल.
सिंह: विविध क्षेत्रांत तुमच्या हातून उल्लेखनीय कामगिरी होईल. अनेक अडचणी दूर होतील. त्यामुळे हलके वाटेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. मात्र, पोटाचा विचार करून खा. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. अनपेक्षित लाभ होतील. घरी पाहुणे मंडळी येतील.
कन्या: जे-जे ठरवाल ते-ते सिद्धीस जाईल, अशी परिस्थिती राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात भरभराट होईल. गुरुवारी, शुक्रवारी गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. शनिवारी चतुर्थ स्थानातील चंद्र भ्रमणामुळे कार्यक्षेत्रात बदलांना सामोरे जावे लागेल.
तूळ: यशच यश मिळेल. संयमाने वागण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात विलंब झाला तरी चालेल पण आततायीपणा करता कामा नये हे पथ्य पाळा. खर्चाला आवर घातला पाहिजे. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळू शकेल. भेटवस्तू मिळतील. गुरुवार, शुक्रवार चंद्राचे धन स्थानातील भ्रमण धनदायक ठरेल.
वृश्चिक: काही अनुकूल तर काही प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. देवाण-घेवाण करताना सावध राहा. कायद्याची बंधने पाळा. लोकांशी गोडीत बोलून कामे करून घ्यावी. शनिवारी धन स्थानातील चंद्रामुळे एखादे पैशाचे काम होईल.
धनु: कार्यक्षेत्रात वर्चस्व सिद्ध कराल. मात्र त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील. सरते शेवटी यश मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. गुरुवार, शुक्रवार व्यय स्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे काही अडचणी येतील. संयमाने वागून त्यातून मार्ग काढण्याची गरज राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका.
मकर: एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. गुरुवार, शुक्रवार लाभ स्थानात चंद्र असल्याने या काळात अनुकूल वातावरण राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. एखाद्या उपक्रमात भरभरून यश मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. शनिवारी थोडे सबुरीने वागा.
कुंभ: वाहने जपून चालवा. उन्हात जास्त फिरू नका. भाग्याची चांगली साथ मिळेल. समाजात मान वाढेल. मुलांचे कौतुक होईल. घरी पाहुणे मंडळी येतील. कामाचे स्वरूप बदलेल. शनिवारी लाभ स्थानातील चंद्र भ्रमणाची शुभ फळे मिळतील. पैशाचा ओघ सुरू राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल.
मीन: चांगली फळे देणारा काळ ठरू शकेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. गुरुवार, शुक्रवार नशिबाचा कौल बाजूने राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून आपली कामे करून घ्यावी. कलाकौशल्याला पूरक वातावरण राहू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.