गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:08 IST2025-05-01T09:57:22+5:302025-05-01T10:08:09+5:30
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर होणार असून, या महिन्याची सुरुवात कोणत्या राशींसाठी कशी असू शकेल? कसा प्रभाव पडेल? जाणून घ्या...

मे महिना सुरू झाला आहे. अनेकार्थाने मे महिना विशेष ठरणार आहे. या महिन्यात मोहिनी एकादशी, बुद्धपौर्णिमा, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, वैशाख संकष्ट चतुर्थी, अपरा एकादशी, शनैश्चर जयंती, सोमवती भावुका अमावास्या, गंगा दशहरा असे अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी होणार आहे. तर ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या मे महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मे महिन्यात तब्बल ६ ग्रहांचे राशीपरिवर्तन असून, बुध ग्रह एकाच महिन्यात दोनवेळा राशी परिवर्तन करणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बुध मेष राशीत, महिन्याच्या उत्तरार्धात बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य वृषभ राशीत गोचर करणार असून, वृषभ संक्रांती सुरू होणार आहे. तसेच शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे.
सर्वांत विशेष म्हणजे गुरु आणि राहु-केतु हे ग्रह गोचर करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत सुमारे वर्षभर असतो. परंतु, मे महिन्यानंतर गुरु वृषभ राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर गुरु ग्रह अतिचार गतीने राशी गोचर करणार आहे. तसेच राहु-केतु सुमारे दीड वर्ष एका राशीत असतात. विद्यमान स्थितीत राहु-केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असून, मे महिन्यात राहु-केतु अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत प्रवेश करतील. मे महिन्याचा एकंदरीत विचार केल्यास कोणत्या राशींना मे महिन्याची सुरुवात अतिशय चांगली ठरू शकेल? जाणून घेऊया...
मेष: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात लोकांची चांगली साथ राहील. वडीलधाऱ्या मंडळींची मदत मिळेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. चंद्र, मंगळ युतीमुळे शनिवारी उत्साही वातावरण राहील. कार्यक्षेत्रात अनुकूल बदलाची चाहूल लागेल.
वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काही अडचणी असतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. कालांतराने परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. प्रेमात असणाऱ्यांनी गैरसमजाला थारा देऊ नये. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात तेजी अनुभवायला मिळेल.
मिथुन: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. आर्थिक आवक चांगली राहील. हाती आलेला पैसा काही ना काही कारणाने खर्च होईल. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. कुणाच्या आश्वासनांवर अवलंबून राहू घडून येईल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. मालमत्तेची कामे होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. शेवटच्या टप्प्यात अचानक मोठा फायदा होऊ शकतो.
कर्क: काही नवीन बदलांना सामोरे जावे लागेल. त्यातून उत्पन्नाचा नवीन स्रोत दिसू शकतील. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घेतली पाहिजेत. वादविवादात पडून काही फायदा होणार नाही. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. चंद्र भ्रमणामुळे शुभ फळे मिळतील. एखादे महत्त्वाचे काम अचानक कुणाची तरी मदत मिळून पूर्ण होईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो.
सिंह: अनेक प्रश्न सुटतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. भेटीगाठी फलद्रूप होतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोक मान देतील. नोकरी व्यवसायात नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. शुभ फळे मिळतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळा.
कन्या: महत्त्वाची कामे करताना घाई करू नका. अडचणी दूर होतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. प्रेमात सफलता मिळेल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. धनलाभ होईल.
तूळ: साधकबाधक अनुभव येतील. अनुकूल परिणाम जास्त असतील. जीवनसाथीशी गैरसमज होऊ नयेत, याची काळजी घ्या. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन जपून चालवा. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. कालांतराने अनुकूल परिस्थिती राहील. अडचणी दूर होतील. समाजात मान वाढेल.
वृश्चिक: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सबुरीने वागल्यास सगळ्या अडचणीतून बाहेर पडलेले असाल. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. प्रेमात रुसवे-फुगवे राहतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. वाहन जपून चालवा.
धनु: प्रवासात काळजी घ्या. मुलांशी संवाद साधा. त्यांच्या अडचणी समजून घ्या. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यासाठी घरातील जबाबदाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. योजना गुप्त ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. मनात सकारात्मक विचार राहतील. अडचणी दूर होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे.
मकर: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुरी होतील. थोडे सबुरीचे धोरण ठेवा. लोकांशी वाद टाळा. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. कामाचा ताण राहील. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जवळचा प्रवास घडून येईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना शुभ वार्ता कळेल. योजना लोकांना सांगू नका.
कुंभ: थोडे सतर्क राहण्याची गरज आहे. प्रवासात काळजी घ्या. मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. भावंडांशी गैरसमज होऊ शकतात. चांगले अनुभव येतील. महत्त्वात्ची कामे होतील. घरात उत्सवी वातावरण राहील. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत शुभ संकेत मिळतील. ज्ञानाची कदर होईल. मान-सन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन: प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. त्यामुळे मनावरील दडपण निघून जाईल. मनात नवीन उमेद राहील. आर्थिक आवक चांगली राहील. जवळच्या सहलीला जाऊन याल. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.