२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:07 IST2026-01-14T07:53:19+5:302026-01-14T08:07:00+5:30
Surya Gochar Makar Sankranti 2026: पुढील महिनाभर सूर्य मकर राशीत असेल. सूर्याची मकर संक्रांत तुमच्यासाठी कशी असेल? सूर्य गोचर काळात नेमके कोणते अगदी सोपे उपाय करणे उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या...

Sun Transit In Capricorn 2026: ज्योतिषशास्त्रात सूर्याला नवग्रहांचा राजा मानले गेले आहे. इंग्रजी नववर्ष २०२६ मध्ये सूर्याचे पहिले गोचर मकर राशीत असणार आहे. गुरूचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत सूर्य प्रवेश करत आहे. पुढील सुमारे महिनाभर सूर्य मकर राशीत विराजमान असेल.

Surya Gochar In Makar Rashi 2026: सुमारे एक महिनाभर सूर्य एका राशीत असतो. सूर्याच्या राशी संक्रमणाला संक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे सूर्याचे मकर राशीतील गोचर मकर संक्रांत म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये मकर संक्रांत एक सण-उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते.

Surya Gochar Makar Sankranti 2026: सूर्याचे मकर राशीतील गोचर अनेक राशींना उत्तम लाभाचे, सौख्याचे, सुबत्तेचे, कल्याण-मंगलकारक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. सूर्याची अधिकाधिक कृपा प्राप्त व्हावी, यासाठी काही अगदी सोपे उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय पुढील महिनाभर संकल्प करून नियमितपणे केल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...

मेष: सूर्याचे मकर राशीतील संक्रमण मेष राशीसाठी शुभ राहील. हा काळ नवीन जबाबदाऱ्यांचा असेल. सूर्याचे हे गोचर मुलांच्या जीवनात प्रगती आणि सौभाग्य घेऊन येईल. कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही करिअरमध्ये पुढे जाल. घर किंवा वाहन खरेदीसाठी वेळ अनुकूल आहे. सरकारकडून सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात स्थिती मजबूत राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध सुधारतील. वैयक्तिक नातेसंबंध उत्तम राहतील. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत होईल. उपाय: भगवान शिवाला जलाभिषेक करावा, लाभ होईल.

वृषभ: सूर्याचा मकर राशीत प्रवेश वृषभ राशीसाठी सकारात्मक असेल. नशिबाची साथ मिळेल. मात्र, वडील आणि घरातील थोरामोठ्यांशी असलेल्या संबंधात काही अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधात अहंकार टाळा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. प्रदीर्घ काळापासून एखाद्या कामाची प्रतीक्षा करत असाल, तर ते पूर्ण होईल. तरीही, यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. आर्थिक बाबतीत सध्या थोडे सतर्क राहावे लागेल. उपाय: दररोज पाण्यात कुंकू मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.

मिथुन: सूर्याचा मकर राशीतील प्रवेश मिथुन राशीसाठी अनपेक्षित परिणाम देणारा ठरेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. आकस्मिक धनप्राप्तीचे योग बनतील. पैसे बऱ्याच काळापासून कोठे अडकले असतील, तर ते आता परत मिळू शकतात. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात प्रवासाला जाऊ शकता. नात्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे; बाहेरील अन्नपदार्थ टाळणे हिताचे ठरेल. उपाय: भगवान सूर्याच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा, लाभ होईल.

कर्क: सूर्याचे मकर राशीतील गोचर कर्क राशीसाठी सामान्य फलदायी असेल. पुढील एक महिना थोडी काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात कलहाची स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मानसिक अशांती जाणवेल. कुटुंब आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित असेल. नात्यात प्रेमाची कमतरता भासू शकते. कामाचा बोजा वाढेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बचतीमध्ये अडचणी येतील. या काळात पैसा खर्च होऊ शकतो. उपाय: दररोज सूर्याला जल अर्पण करावे, लाभ होईल.

सिंह: सिंह राशीसाठी सूर्याचे मकर राशीतील गोचर फायदेशीर ठरेल. कमी प्रयत्नात यश मिळेल. सर्व रणनीती यशस्वी होतील. निकाल बाजूने लागतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. मेहनतीमुळे यश मिळेल. उत्पन्न वाढेल, परंतु उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे कठीण जाईल. जोडीदाराशी प्रामाणिक राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. उपाय: दररोज सूर्यनमस्कार घालावेत, लाभ होईल.

कन्या: सूर्याचे मकर राशीतील गोचर कन्या राशीसाठी प्रगतीचे असेल. सूर्याच्या प्रभावामुळे यश मिळेल आणि नोकरीत लाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. आवडीचे छंद जोपासू शकाल. मनात नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो. कामाचे कौतुक होईल. नात्यात थोडे अंतर येऊ शकते, त्यामुळे परस्परांवरील विश्वास टिकवून ठेवा. परीक्षेत यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. उपाय: भगवान शिवाची पूजा करणे शुभ फलदायी ठरेल.

तूळ: तूळ राशीसाठी सूर्याचे मकर राशीतील गोचर थोडे कठीण जाऊ शकते. या काळात काही अनपेक्षित परिणामांसह चढ-उतारांचा सामना करावा लागेल. कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तणाव वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध सामान्य राहतील. या काळात जमिनीच्या व्यवहारांपासून दूर राहा. गुंतवणूक करायची असल्यास विचारपूर्वक पाऊल उचला. आर्थिक लाभ होईल पण खर्चही चालू राहतील. विचलित मनस्थितीमुळे अभ्यासात लक्ष लागणार नाही. आरोग्यावर खर्च होऊ शकतो. उपाय: दररोज गाईला गूळ खाऊ घालावा, लाभ होईल.

वृश्चिक: सूर्याचे मकर राशीतील गोचर वृश्चिक राशीसाठी थोडे त्रासाचे ठरू शकते. या काळात खूप मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. प्रवासाचे योग येतील. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. चांगले यश मिळू शकते. मेहनतीने आणि धैर्याने कठीण परिस्थितीवर मात कराल. कुटुंबात एखादे मांगलिक कार्य ठरेल. भावंडांशी मतभेद होऊ शकतात. मात्र घरातील वृद्धांच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. उपाय: गरजूंना गव्हाचे दान करावे, ते लाभदायक ठरेल.

धनु: धनु राशीसाठी सूर्याचे मकर राशीतील गोचर सामान्य राहील. नशिबाची आणि वडिलांची साथ मिळेल. या काळात नातेसंबंध सुधारतील आणि जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत होईल. मात्र, कुटुंबात कोणाशी तरी मतभेद किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला आहे. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित कराल. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित वादांचे निराकरण होईल. कोणालाही उधार देणे टाळा. उपाय: दररोज सूर्याच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा, लाभ होईल.

मकर: पुढील सुमारे महिनाभर सूर्य याच राशीत असेल, त्यामुळे विशेष खबरदारी घ्यावी लागेल. नात्यांमध्ये सावधानता बाळगा, जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गोचरच्या प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल, परंतु त्यासोबत अहंकारही येऊ शकतो. सरकारी कामात यश मिळेल. या काळात जोडीदार किंवा बिझनेस पार्टनरसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. करिअरमधील असंतोषामुळे वारंवार नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. रागावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्यावी. उपाय: दररोज वडिलांचा आशीर्वाद घ्यावा, चांगले परिणाम मिळतील.

कुंभ: कुंभ राशीसाठी सूर्याचे मकर राशीतील गोचर चांगले असेल, मात्र धावपळीमुळे खर्च वाढतील. जर विवाहाची चर्चा सुरू असेल, तर थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका, ते अडकू शकतात. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांत लक्ष द्यावे. उपाय: आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊनच कोणत्याही कामाची सुरुवात करावी, लाभ होईल.

मीन: मीन राशीसाठी सूर्याचे मकर राशीतील गोचर सामान्यपेक्षा चांगले असेल. नातेसंबंध सुधारतील आणि ते अधिक दृढ व आनंदी बनवण्यावर भर द्याल. या काळात उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. मालमत्तेचे वाद मिटतील. समाजात सन्मान वाढेल. मुलांशी संबंधित चिंता दूर होईल आणि उपाय: 'आदित्य हृदय स्तोत्रा'चे पठण करणे अत्यंत लाभदायक ठरेल.

















