१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:48 IST2025-10-16T08:31:52+5:302025-10-16T08:48:51+5:30
दिवाळीच्या आनंदी, उत्साही आणि शुभ काळात सर्वोत्तम पुण्य फल देणारे राजयोग जुळून येत आहेत. काही राशींना दिवाळी वरदानापेक्षा कमी असणार नाही, असे म्हटले जात आहे.

Diwali 2025 Astrology: दिवाळीचा अत्यंत शुभ काळ अगदी काही दिवसांत सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवाळीच्या काळात अनेक राजयोग जुळून येत आहेत. या राजयोगांमुळे अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, सर्वोच्च संधी आणि सर्वोत्कृष्ट फले मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य तूळ राशीत प्रवेश करत असून, आगामी काळ तूळ संक्रांत म्हणून ओळखला जाईल. आताच्या घडीला तूळ राशीत बुध आणि मंगळ विराजमान आहे. सूर्य आणि बुधाचा बुधादित्य, सूर्य आणि मंगळाचा मंगल आदित्य राजयोग जुळून येत आहे. तसेच तूळ राशीत त्रिग्रही योगही आहे.
शुक्राच्या कन्या राशीतील प्रवेशाने नीचभंग योग जुळून येत आहे. तसेच गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करत आहे. कर्क ही गुरूची उच्च रास असल्यामुळे हंस महापुरुष राजयोग जुळून येत आहे. तसेच शनि आणि शुक्र यांचा समसप्तक योग, राहु आणि केतु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. तुमची रास कोणती? या दिवाळीतील ग्रहमानाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...
मेष: ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. अनेक अडचणी दूर होतील. जवळच्या लोकांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. मौजमजा करण्याच्या निमित्ताने फिरणे होईल. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. काहींना अचानक मोठी संधी मिळेल. बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर तुमचे काम फत्ते होईल. पगारवाढ व सोयी-सुविधा वाढवून मिळतील.
वृषभ: ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. प्रगतीला पूरक वातावरण राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मालमत्तेची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. चांगली फळे मिळतील. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. मात्र, गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. भावंडांशी सख्य राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल.
मिथुन: महत्त्वाची कामे होतील. अनेक अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. विवाहेच्छूना अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. भागीदारी व्यवसायात फायदा होईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी.
कर्क: गुरू चंद्र भ्रमणामुळे मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना तीर्थयात्रा करण्याचे योग येतील. सतत प्रवासात किंवा एखाद्या कार्यात व्यस्त राहाल. काहींना दूरच्या प्रवासाचा योग येईल. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील. मात्र, परिस्थिती आटोक्यात येईल. अडचणीतून मार्ग निघेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील.
सिंह: उत्साह राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. महत्त्वाची कामे हातावेगळी करणे योग्य राहील. मनात संमिश्र स्वरुपाचे विचार राहतील. काही अडचणी असतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काहींना धार्मिक कार्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. आपण वक्तशीरपणा आणि शिस्त याकडे दुर्लक्ष करू नका. नेहमीची कामे वेळच्या वेळी करा. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल.
कन्या: कटू-गोड अनुभव येतील. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी कराल. नोकरीत उच्च पद प्राप्ती होईल. जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न सफल ठरतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. एखादे महत्त्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण कराल. भेटीगाठी फलद्रूप होतील. काही अडचणी येतील. नियमानुसार कामे करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
तूळ: चंद्राचे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांकडून मान मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्यावी.
वृश्चिक: मान-सन्मान मिळेल. काही अडचणी असतील. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहने सावकाश चालवा. अडलेली कामे मार्गी लागतील. सामाजिक आदर प्राप्त होईल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. एखादी शुभवार्ता मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. धनलाभ होईल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. वरिष्ठांकडून प्रशस्तिपत्र मिळेल.
धनु: अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. मात्र, अति आत्मविश्वास बाळगू नका. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र, फार मोठी आर्थिक जोखीम घेण्याचा मोह आवरला पाहिजे. वाहन जपून चालवा. परिस्थिती आटोक्यात येईल. चुकांमधून बोध घेऊन मार्गक्रमण करीत राहाल.
मकर: ग्रहमानाचा साधकबाधक अनुभव येईल. घाईघाईत कामे करू नका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. कार्यक्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील. काही अडचणी येतील.
कुंभ: मुले प्रगती करतील. नोकरीतील अडचणी दूर होतील. कामाचा व्याप असला तरी थोरामोठ्यांची कृपा असल्याने कामाचे काही वाटणार नाही. मन आनंदून जाईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नवीन शिकण्यासाठी वेळ मिळेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रतिक्रिया सावधपणे द्यावी. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.
मीन: नोकरीत नवीन संधी चालून येईल. बढती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात मंगलमय वातावरण राहील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. उत्तरार्धात मात्र आपण फार दगदग करू नका. कामाच्या नादात आरोग्यावर ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. जीवनसाथीची काळजी घ्यावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.