Diwali 2021: दिवाळीबरोबरच नोव्हेंबरचा संपूर्ण महिना 'या' चार राशींच्या भाग्यात होणार रोषणाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 14:26 IST2021-10-20T14:19:24+5:302021-10-20T14:26:10+5:30

Diwali 2021 : नोव्हेंबरमध्ये ३ महत्त्वाच्या ग्रहांची स्थाने बदलत आहेत. हा स्थानबदल सर्व राशींसाठी शुभ ठरणार आहेच परंतु विशेषतः पुढील ४ राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा ठरणार आहे.

नोव्हेंबरमध्ये बुध, गुरु आणि सूर्य यांची राशीस्थाने बदलत आहेत. हे तीन ग्रह बुद्धिमत्ता, नशीब, पराक्रम, यशाचे कारक आहेत. त्यांच्या स्थानबदलामुळे १२ राशीच्या लोकांना कमी अधिक प्रमाणात लाभ होणार आहेत, त्यात विशेषतः पुढील चार राशी लाभ प्राप्तीच्या दृष्टीने अग्रेसर राहतील.

कर्क राशीच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये नोकरीत बढती मिळू शकते. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळेल. कुटुंब तसेच मित्र परिवाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. धनप्राप्ती आणि गुंतवणुकीसाठी चांगला काळ असेल. योग्य निर्णय घेतलेत तर भविष्यात त्याचे दीर्घकाळ फायदे उपभोगू शकाल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा अतिशय आरामदायक काळ असेल. जे त्रास होते ते आता संपतील. कामाच्या ठिकाणी वेळ चांगला जाईल, तुम्हाला आदर मिळेल. संपूर्ण महिनाभर आर्थिक स्थिती चांगली राहील.

धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. मेहनतीला पूर्ण फळ मिळेल. करिअरसाठी हा महिना उत्तम आहे. आरोग्य, कौटुंबिक जीवन चांगले राहील. बोलण्याच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने जिभेवर ताबा ठेवा म्हणजे आरोग्य आणि नाती दोन्हीची जपणूक होईल.

मीन राशीच्या लोकांना महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पैसे मिळतील. अपेक्षित कामे होतील. नशीब साथ देईल. जीवनात आनंद मिळेल. पुढील काळ सुखाचा व आनंदाचा ठरेल.