धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:04 IST2025-12-16T08:49:14+5:302025-12-16T09:04:58+5:30
Dhanurmaas Surya Gochar Dhanu Sankranti December 2025: धनुर्मासारंभ सुरू झाला असून, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

Dhanurmaas 2025 Astrology: १६ डिसेंबर २०२५ रोजी धनुर्मासारंभ होत आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सुमारे ३० दिवसांनी राशी परिवर्तन करत असतो. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या गोचराला संक्रमण म्हटले जाते. सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्या राशीला संक्रांत काळ संबोधले जाते.

Sun Transit In Sagittarius December 2025: डिसेंबर महिन्यात सूर्य धनु राशीत प्रवेश करत असून, हा आगामी काळ धनु संक्रांत म्हणून ओळखला जाईल. तसेच हा सूर्य गोचराचा हा ३० दिवसांचा काळ धनुर्मासारंभ म्हणूनही संबोधला जातो. धनुर्मास हा धार्मिक कार्यांसाठी शुभ असला तरी, हा काळ काही भौतिक शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानला जातो.

Surya Gochar Dhanu Sankranti December 2025: धनुर्मासाला काही ठिकाणी 'खरमास' असेही म्हणतात. खरमासमध्ये कोणताही महत्त्वाचा निर्णय किंवा मोठे शुभ कार्य करू नये, अशी मान्यता आहे. धनुर्मास सूर्य गोचर धनु संक्रांत कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरू शकेल, कसा प्रभाव राहील, कोणते उपाय करणे शुभ पुण्य फलदायी ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: सूर्यदेवाचे हे गोचर उत्तम संधी आणि प्रगतीचा काळ घेऊन येत आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. प्रेमसंबंधांना बळ मिळेल. करिअरमध्ये मोठी उन्नती साधण्याची शक्यता असून कार्यक्षेत्रात मोठे यश पदरी पडेल. उत्पन्नात भरघोस वाढ होईल. एखादा नवीन व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली गती मिळेल. उपाय: लाभ मिळवण्यासाठी दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हितकारक ठरेल.

वृषभ: हा काळ फारसा अनुकूल नाही, त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागेल. वैयक्तिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून जोडीदारासोबत समन्वय राखा. मालमत्तेशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावे. व्यापार आणि ट्रेडिंग यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. उपाय: प्रतिदिन गायत्री चालीसा पठण करणे लाभदायक ठरेल.

मिथुन: सूर्य गोचर सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. वैवाहिक जीवनातील संबंध सुधारतील. उत्तम सामंजस्य राहील. आर्थिक स्थिती चांगली होईल. उत्पन्नातही वाढ होईल. मात्र, व्यावसायिक भागीदारांसोबतचे संबंध फारसे चांगले राहणार नाहीत. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. उपाय: गायत्री मंत्राची एक माळ जपल्यास निश्चितच लाभ होईल.

कर्क: हा काळ सामान्य फलदायी असू शकतो. जोडीदारासोबत वादामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. संयम ठेवा आणि जुळवून घ्या. व्यापाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. लाभ कमी होऊ शकतो. खर्च वाढण्याची चिन्हे आहेत. गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. उपाय: पाण्यात कुमकुम मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास लाभ होईल.

सिंह: हा काळ मध्यम असला तरी, मोठे लाभाचे योग बनत आहेत. जोडीदारासोबत उत्तम ताळमेळ राहील. प्रेमसंबंधात मात्र थोडी अडचण येऊ शकते. गुंतवणूक आणि ट्रेडिंगमधून फायदा संभवतो. व्यापारात वाढ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. उपाय: भगवान सूर्याच्या कोणत्याही मंत्राचा दररोज जप करणे शुभ राहील.

कन्या: या गोचरादरम्यान जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. सुरुवातीला कुटुंबात तणाव जाणवू शकतो. सावधगिरी बाळगा. नंतर कुटुंबासोबतचे नाते सुधारतील. आर्थिक परिणाम संमिश्र राहतील; आर्थिक व्यवहारात सतर्कता ठेवा. करिअरसाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. उपाय: आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे लाभकारी ठरेल.

तूळ: सूर्य गोचरामुळे अडचणी कमी होतील. हा काळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतच्या संबंधात तणाव किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. व्यापारात लाभ होईल. करिअरमध्ये मेहनतीनुसार कमी फळ मिळाल्याची भावना राहील. प्रवासाचे योग आहेत. उपाय: सूर्याष्टक स्तोत्राचे पठण करणे लाभदायक राहील.

वृश्चिक: सूर्य गोचर शुभ आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. परस्पर प्रेमामुळे नाते अधिक मजबूत होईल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ उत्तम राहील. करिअरमध्ये मेहनत आणि आत्मविश्वासामुळे लाभ होईल. आर्थिक फायदा होईल. उपाय: गायत्री चालीसा पठण करणे चांगले राहील.

धनु: सूर्य गोचराचा हा काळ अत्यंत शुभ असून भाग्याची साथ मिळेल. नात्यांसाठी काळ उत्तम आहे; जोडीदारासोबत प्रेम वाढेल. भावनिक संबंध मजबूत होतील. अहंकार वाढण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मनपसंत यश मिळेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उपाय: दररोज सूर्यदेवाला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करणे उत्तम राहील.

मकर: सूर्य गोचर मिश्र फल देणारे राहील. या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहा. जोडीदारासोबत सामंजस्य राखण्याची गरज आहे. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्या स्रोततून आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापारात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उपाय: भगवान शिवावर जलाभिषेक करणे शुभ फलदायी होईल.

कुंभ: सूर्य गोचर लाभकारी ठरेल. जोडीदारासोबतचे नाते मजबूत होतील. उत्तम समन्वय राहील. करिअर चांगले चालेल. नवीन नोकरीचे प्रस्ताव मिळू शकतात. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात लाभ होईल. कोणतेही कार्य करण्यापूर्वी वडिलांचा सल्ला नक्की घ्यावा.उपाय: भगवान सूर्याला पाण्यात कुमकुम मिसळून अर्घ्य दिल्यास लाभ होईल.

मीन: सूर्य गोचर शुभ राहील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. नात्यात निकटता येईल. व्यापारात चांगला लाभ होईल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. कार्यस्थळी स्थिती मजबूत बनेल. जमीन, मालमत्तेशी संबंधित कामे सहजपणे पूर्ण होतील. उपाय: गरिबांना गहू आणि गूळ दान करणे लाभकारी राहील.

















