Lunar Eclipse November 2022: चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीचे लोकं होतील मालमाल, शुभ-लाभ; कोणावर प्रतिकूल प्रभाव? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 10:29 AM2022-11-05T10:29:39+5:302022-11-05T10:37:28+5:30

Lunar Eclipse November 2022: तुमची रास कोणती? तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण कसे ठरेल? जाणून घ्या...

नोव्हेंबर महिन्यात या सन २०२२ वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. कार्तिक पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाची सुरुवात म्हणजेच ग्रहणस्पर्श भारतात दिसणार नाही, तर चंद्रग्रहणाचा मोक्ष दिसेल. (chandra grahan november 2022)

कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार असून, ते खग्रास पद्धतीने भारतात दिसणार आहे. ऐन दिवाळीत सूर्यग्रहण झाले होते. आता तुळशी विवाहाला चंद्रग्रहण होत आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. (lunar eclipse november 2022)

ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचा ग्रहणस्पर्श दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटे असून, ग्रहण मध्य दुपारी ४ वाजून ३० मिनिटे आणि मोक्ष सांयकाळी ६ वाजून १९ मिनिटे आहे. या चंद्रग्रहणाला २०० वर्षांनंतर दोन प्रतिकूल योगही तयार होत आहेत. या योगामुळे काही राशीच्या व्यक्तींना हा काळ समस्याकारक, अडचणींचा ठरू शकतो. तर काही राशींना हे चंद्रग्रहण अतिशय शुभ-लाभदायक ठरू शकते. तुमची रास कोणती? तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण कसे ठरेल? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकते. नोकरीत अधिकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. परंतु या काळात बोलण्यावर संयम ठेवावा. वाहन खरेदी करू शकतात. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते.

वृषभ राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. आत्मविश्वासाची कमतरता दिसून येऊ शकेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मित्र-मंडळींशी गाठी-भेटी होऊ शकतील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण अनुकूल ठरू शकेल. यावेळी मन अस्वस्थ होईल. स्वावलंबी व्हा. नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. रागावर संयम ठेवावा. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. वाहन सुखात घट होऊ शकते. मुलांकडून काही सुखद बातमी मिळू शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण सकारात्मक ठरू शकेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. लाभाच्या अनेक नवीन संधी मिळतील आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. अभ्यासात रुची राहील. पण शैक्षणिक कामात अडथळे येतील. मनात निराशा आणि असंतोष राहू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण उत्तम ठरू शकेल. मन प्रसन्न राहील. बौद्धिक कामे पैसे कमावण्याचे साधन बनू शकतात. आरोग्याची समस्या असू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तूळ राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. मन अस्वस्थ होईल. कुटुंबासह तीर्थाटनाला जाण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. कला आणि संगीतात रुची वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा दिसून येतो. खर्च वाढतील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. आरोग्याबाबत सावध राहा. कौटुंबिक समस्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. उत्पन्न कमी आणि खर्च वाढू शकतो. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मुलाच्या आरोग्याबाबत चिंता वाढू शकते.

धनु राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. आत्मविश्वासाची कमतरता राहील. मन अस्वस्थ होईल. मित्राच्या मदतीने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील आणि वादात अडकू शकतात.

मकर राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण चांगले ठरू शकेल. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासही वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती प्रतिकूल असेल. उच्च अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतात, त्यामुळे यावेळी सावधगिरी बाळगा.

कुंभ राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण लाभदायक ठरू शकेल. कला किंवा संगीतात रुची वाढेल. घरामध्ये काही धार्मिक आणि शुभ कार्य होऊ शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरी मिळू शकते. तुम्हाला सन्मान मिळेल आणि उत्पन्न वाढेल.

मीन राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण अनुकूल ठरू शकेल. मानसिक शांतता राहील. संभाषण संयमित, संतुलित राखा. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आत्मविश्वासाची कमतरता राहील. मालमत्ता उत्पन्नाचे साधन बनू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.