जी भीती होती, तेच झाले; बाबा वेंगाचे भाकित खरे ठरले; अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाने जग भयभीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:55 IST2026-02-28T16:41:47+5:302026-02-28T16:55:45+5:30
Baba Vanga War Prediction News: अमेरिका-इस्रायल-इराण आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध सुरू झाल्याने बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीबाबत चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

Baba Vanga War Prediction News: इस्रायलने शनिवारी इराणविरोधात सैन्य कारवाई सुरू केली. इराणची राजधानी तेहरानमध्ये जोरदार स्फोटाचे आवाज ऐकायला येत आहेत. राजधानीत कमीत कमी ३ मोठे स्फोट झाले आहेत. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्यांची पुष्टी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात बॅक डोअर चर्चा सुरू होती. परंतु, अशातच हे हल्ले करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या सुमारे ३० शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. रशिया, युरोपियन सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. तसेच अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ल्यांमुळे वाटाघाटीद्वारे तोडगा निघण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

यातच आता बाबा वेंगा यांनी युद्धाबाबत केलेले भाकित खरे ठरत असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. बाबा वेंगाची भाकित नेहमीच चर्चेत असतात. ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या कालांतराने खरी ठरल्याचे मानले जाते.

बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की २०२६ मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल. तसेच असेही भाकीत केले होते की, २०२६ हे वर्ष युद्धाचे असेल. जगाच्या पूर्वेकडील भागात एक मोठे युद्ध सुरू होईल, जे विनाशकारी ठरेल.

हे युद्ध हळूहळू जगभर पसरेल. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली आहे, असे म्हटले जात आहे. या देशांमधील युद्धाच्या उद्रेकाने जगभरातील लोक घाबरले आहेत.

बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, मार्च-एप्रिल २०२६ मध्ये एक भयानक युद्ध सुरू होऊ शकते. या युद्धानंतर, बाबा वांगा यांच्या आणखी एका भविष्यवाणीने लोक अधिकाधिक घाबरत आहेत, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की रशिया आणि अमेरिका सारखे शक्तिशाली देश युद्धात एकमेकांना सामोरे जाऊ शकतात.

बाबा वेंगा यांनी असा दावा केला की, युद्धाचा सर्वांत जास्त परिणाम जगाच्या पश्चिमेकडील भागावर होईल आणि युरोपला सर्वात जास्त फटका बसेल. त्यांनी असा दावा केला की, या विध्वंसामुळे युरोप ओसाड होईल. रशिया एक मोठी जागतिक शक्ती म्हणून उदयास येईल असेही भाकीत केले.

जेव्हा जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा केली जाते तेव्हा बाबा वेंगा यांचे नाव आघाडीवर असते. त्यांच्या भविष्यवाण्यांमुळे त्यांना बाल्कन प्रदेशाचे नोस्ट्राडेमस म्हणून ओळखले जाते. बल्गेरियातील अंध बाबा वेंगा यांनी अशा अनेक भाकिते केली होती, ज्यात सोव्हिएत युनियनचे विघटन आणि अमेरिकेत अल कायदाचा हल्ला यांचा समावेश होता. ही भाकिते खरी ठरली आहेत.

तसेच बाबा वेंगाची भविष्यवाणी पुन्हा खरी ठरली आहे आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले होते, ज्यामध्ये ७० लोक ठार झाले होते. यामुळे दोन्ही देशांमध्ये सीमेवर संघर्ष सुरू झाला.

गुरुवारी रात्री उशिरा तालिबानने पाकिस्तानात हल्ले सुरू केले आणि शुक्रवारी पहाटे पाकिस्ताननेही अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले. सोव्हिएत युनियनचे पतन, अमेरिकेत ९/११ चे दहशतवादी हल्ले, तंत्रज्ञानाचा विकास, चीनचा विकास, स्मार्टफोनचा वाढता प्रभाव याबाबत बाबा वेंगा यांनी केलेली भाकिते खरी ठरली आहेत.

तसेच दहशतवादाचा भस्मासूर, २०२५ मध्ये म्यानमारमध्ये भूकंप, २०२५ मध्ये युद्धे (भारत-पाकिस्तान, पाकिस्तान-अफगाणिस्तान, इस्रायल-इराण आणि थायलंड-कंबोडिया यांच्या युद्धाबाबतही बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी होत असल्याचे सांगितले जात आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















