१४ वर्षांनी ‘हा’ ग्रह रास बदलणार! ‘या’ ५ राशींचा वनवास संपणार; भरभराट, धनलाभ, भाग्योदय काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:10 AM2022-08-28T10:10:10+5:302022-08-28T10:10:10+5:30

वक्री चलनाने हा ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या...

वास्तविक पाहता ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांपैकी न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह हाच सर्वाधिक जास्त काळ एखाद्या राशीत विराजमान असतो, असे सांगितले जाते. मात्र, नवग्रहांव्यतिरिक्त असे काही ग्रह आहेत, ज्यांचा समावेश ज्योतिषशास्त्रात केला जातो. मात्र, त्याचा अंतर्भाव महादशा, अंतर्दशा यामध्ये केला जात नाही. परंतु, फलादेश सांगताना या ग्रहांचा विचार केला जातो.

नवग्रहांशिवाय हर्षल, नेपचून आणि युरेनस असे तीन ग्रह आहेत, ज्यांचा समावेश तुम्हाला तुमच्या कुंडलीत पाहायला मिळू शकेल. मात्र, ज्योतिषशास्त्राचा मुख्य आधार नवग्रह हेच आहेत. जन्मकुंडलीतील ग्रह आणि घरांच्या आधारे महादशा, अंतर्दशा, त्यांची स्थिती आणि ग्रहांची दृष्टी लक्षात घेऊन फलज्योतिषाची गणना केली जाते. परंतु आधुनिक युगात नेपच्यून, प्लुटो आणि युरेनस या तीन नवीन ग्रहांचा जन्मांग चक्रात समावेश केल्याने अचूक अंदाज वर्तवण्यात अधिक मदत होत असल्याचे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रात वरुण ग्रहाचाही उल्लेख आढळतो. यालाच आपण नेपचून या नावाने ओळखतो. हा ग्रह पृथ्वीपासून खूप दूर आहे. तब्बल १४ वर्षांनी वर्षांनंतर ११ सप्टेंबर २०२२ रोजी नेपचून ग्रह आपली राशी बदलणार आहे. या दिवशी नेपचून वक्री मार्गाने कुंभ राशीत प्रवेश करेल. २८ जून २०२२ रोजी नेपचून मीन राशीत वक्री झाला होता. आता यानंतर ०३ डिसेंबर रोजी नेपचून मार्गी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नेपचूनला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी १४ वर्षे लागतात आणि त्यामुळे त्याचे राशीचक्र १६४ वर्षांत पूर्ण होते.

नेपचून ग्रह गूढ विज्ञान, अंतर्ज्ञान, इतरांचे विचार जाणून घेणे, कल्पनाशक्ती आणि वैमानिक ज्ञानाचा कारक मानला जातो. नेपचून जेव्हा शुभ स्थानी असतो, आध्यात्मिक विकास आणि प्रतिष्ठा, कीर्ती प्रदान करतो, असे सांगितले जाते. नेपचूनच्या कुंभ राशीत प्रवेशानंतर काही राशीच्या व्यक्तींना या काळात आर्थिक फायदे होणार आहेत. नेपचून ग्रहाचे राशीपरिवर्तन कोणत्या राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकेल, जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ आहे. आगामी काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या दरम्यान, तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. त्याचबरोबर कला क्षेत्राशी निगडित लोकांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल आहे. या लोकांना पुढील काळात भरपूर यश मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

कर्क राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुख मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत राहील. व्यवसायातही तुम्हाला चांगला फायदा होईल. जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर हे स्वप्न लवकरच होऊ शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात विशेष वाढ होईल. या काळात तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची भरपूर संधी मिळेल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांनाही विशेष लाभ होईल. या काळात तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. नवीन नोकरीचा शोध लवकरच पूर्ण होऊ शकतो.

मकर राशीच्या लोकांसाठी नेपचूनचा राशीबदल विशेष फलदायी ठरू शकेल. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढेल. एवढेच नाही तर या कालावधीत तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. या काळात प्रवासाचे योग तयार होत आहेत. मान-सन्मान मिळेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी नेपचूनचा प्रवेश खूप खास असणार आहे. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही या काळात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही नोकरीसोबत व्यवसायही सुरू करू शकता, असे सांगितले जात आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.