३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:35 IST2025-10-01T13:19:21+5:302025-10-01T13:35:27+5:30
7 auspicious rajyog on Dussehra 2025: यंदाचा दसरा कोणत्या राशींवर अत्यंत शुभ प्रभावाचा ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

7 auspicious rajyog on Dussehra 2025: नवरात्राची सांगता होत आहे. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने अवतार घेत नऊ दिवस युद्ध केले. दशमीला महिषासुराचा वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात.
Dasara 2025 Astrology: आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच ‘विजय’ नावाचा मुहूर्त असतो. त्यावेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते, असे पुराणांत सांगितले आहे. या दिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. शमी वृक्षाजवळच भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिचीही पूजा करतात. यंदाच्या दसऱ्याला विविध शुभ, अद्भूत योग जुळून आलेले आहेत.
गुरुवार, ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी दसरा आहे. या दिवशी बुधादित्य राजयोग, भद्र महापुरुष राजयोग, सूर्य-यम नवपंचम योग, गुरू-शुक्र अर्धकेंद्र योग, शनिचा केंद्र त्रिकोण राजयोग, राहु-केतु शुक्र समसप्तक योग, शनि-रवि बुध समसप्तक योग जुळून आले आहेत. याचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा पडेल? दसऱ्याचा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या...
मेष: काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असल्या, तरी एकंदरीत काळ यश देणारा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. आराम करा. कामाचा ताण घेऊ नका. परिस्थिती आटोक्यात येईल. एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीत नवीन संधी नजरेस पडेल.
वृषभ: चांगली परिस्थिती राहील. परंतु, संयमाची परीक्षा पाहिली जाईल. तब्येतीची काळजी घ्यावी. तरुण वर्गाने मोहापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. अनुकूलता अनुभवायला मिळेल. अडचणी दूर होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मान-सन्मान मिळेल.
मिथुन: चंद्र भ्रमणामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ द्यायला हवा. खाण्या-पिण्याच्या बाबतीत बेपर्वाई नको. चांगले अनुभव येतील. व्यवसायात भरभराट होईल. भेटवस्तू मिळतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मनात सकारात्मक विचार राहतील. लोकांकडून प्रशंसा केली जाईल. पण संयमाने वागण्याची गरज आहे. वाहन हळू चालवा. संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येऊ शकेल.
कर्क: कटू-गोड अनुभव येतील. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र, त्यासाठी बरीच दगदग होईल. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. नवीन योजना आखल्या जातील. मात्र, आरोग्य बिघडेल एवढी दगदग करू नका. योजना लोकांना सांगत बसू नका. काही लोक त्यात विघ्ने आणतील. गुरुवार, शुक्रवार व्यवहार सफल होतील. शनिवारी फार घाईघाईत कामे करू नका. वाहन जपून चालवा.
सिंह: कार्यक्षेत्रात नवीन संधी चालून येईल. त्यात फायदा होईल. मात्र, हळूहळू कामाचा ताण वाढेल. त्यामुळे वेळेचे नियोजन नीट करण्याची गरज भासेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. त्यामुळे मन आनंदून जाईल. मुलांची अनेक दिवसांपासूनची अडलेली कामे मार्गी लागतील. काहींना जवळच्या प्रवासाचा योग येईल. अनेक उत्तम लाभ होतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. गुरुवार, शुक्रवार आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या: सतत यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायातून हाती पैसा येईल. पैशाची गुंतवणूक नीट करा. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. योग्यतेची दखल घेतली जाईल. नवीन पद मिळू शकते. त्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. पाहुणे येतील. शनिवारी आरोग्याची काळजी घ्यावी.
तूळ: चंद्राचे धनस्थानापासून सुरू होणारे भ्रमण फायदेशीर ठरेल. उत्साह राहील. धनलाभ, कार्यसिद्धी, भेटीगाठी या दृष्टीने अनुकूल फळे मिळतील. अनेक प्रकारचे लाभ होतील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी सख्य राहील. जवळचा प्रवास होईल. व्यवसायात भरभराट होईल. मोठी गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्यावी. नोकरीत बदल करण्याची इच्छा असेल, तर त्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही.
वृश्चिक: अनेक अडचणी दूर झालेल्या असतील. मनात उत्साह राहील. काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द राहील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगले दिवस असतील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. हाती आलेल्या पैशाची योग्य प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे. कार्यक्षेत्रात सहकारीवर्गाशी गोडीत बोलून आपली कामे करून घ्यावी.
धनु: काही अडचणी असतील. मात्र, त्या लवकरच संपतील. परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. प्रलंबित कामांचा ताण संपेल. त्यामुळे हलके वाटेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येऊ शकतील.
मकर: चांगल्या घटना घडतील. उत्साह राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कायद्याची बंधने पाळा. लोकांना अवास्तव आश्वासने देऊन शब्दात अडकू नका. नोकरीत पारडे जड राहील. मात्र, अधिकारीवर्गाला नाराज करू नका. हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे.
कुंभ: अनुकूलता अनुभवायला मिळेल. कार्यक्षेत्रात अचानक बदल होऊ शकतात. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. धनलक्ष्मीची कृपा राहील. व्यावसायिक उलाढालीतून फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीचे फायदे होतील. गुरुवार, शुक्रवार अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. लोकांना स्वतःहून सल्ला देऊ नका. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. प्रवासात सतर्क राहा. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
मीन: चांगले अनुभव येतील. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नशिबाचा कौल बाजूने राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. नोकरीत इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. एखादी चांगली संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.