३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:18 IST2025-09-26T13:59:28+5:302025-09-26T14:18:55+5:30
Shani Vakri In Meen Rashi 2025: वक्री शनि आणि केंद्र त्रिकोण राजयोग हा काही राशींसाठी दुग्धशर्करा योग ठरू शकतो, असे म्हटले जाते.

Shani Vakri In Meen Rashi 2025: नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि विद्यमान घडीला मीन राशीत विराजमान आहे. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. आताच्या घडीला शनि मीन राशीत वक्री असून, नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गी होणार आहे. मीन राशीतील वक्री शनिचा केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होतो. काही राशींना शनि वक्री गतीचा मोठा फायदा होऊ शकतो.
कुंडलीतील केंद्रस्थाने, जसे की ४, ७, १० आणि ३, आणि त्रिकोणस्थाने, जसे की १, ५ आणि ९, युती, दृष्टि किंवा राशी बदलतात तेव्हा केंद्र त्रिकोण योग तयार होतो. त्रिकोण आणि भाग्यस्थानांचा स्वामी शनि सध्या मिथुन राशीच्या केंद्रस्थानात भ्रमण करत आहे, ज्यामुळे केंद्र त्रिकोण राज योग तयार होतो.
शनि कर्मकारक ग्रह आहे. शनि मीन राशीत असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. वक्री शनि आणि केंद्र त्रिकोण राजयोग हा काही राशींसाठी दुग्धशर्करा योग ठरू शकतो, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
मेष: वेळ असला तरी वेळेचे नियोजन नीट केले नाही, तर सगळी कामे राहून जातील. मुलांशी संवाद ठेवा. आपली सगळी कामे बाजूला ठेवून पहिले प्राधान्य मुलांना द्या. घाईघाईत निर्णय घेऊ नका, प्रत्येक व्यक्त्तीवर विश्वास ठेवू नका. कालांतराने परिस्थितीत अनुकूलता राहील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे.
वृषभ: सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. कामात झालेल्या बदलामुळे विचलित होऊ नका. झेपतील तेवढीच कामे करा, तसेच लोकांचा विचार करून अवाच्या सव्वा आश्वासने देऊन शब्दात अडकू नका. कामाचा ताण वाढेल. मनस्ताप होऊ शकतो. मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. मात्र, घरातील कामे त्यासाठी मागे पडू देऊ नका. स्वतः:च्या तब्येतीची काळजी घ्या.
मिथुन: अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्यासाठी चांगला काळ आहे. व्यवसायात सतत व्यस्त राहाल, भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्यांच्याशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासात सतर्क राहा. नोकरीत सुरुवातीला कामाचा ताण राहील. वरिष्ठांशी जुळवून घेणे योग्य ठरेल. त्यामुळे संभाव्य अडचणी येणार नाहीत. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. त्यांच्या भावना समजून घ्या. नावलौकिक वाढेल.
कर्क: शुभ फळे मिळतील.धनलक्ष्मीची कृपा राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. करारमदार करताना अटी आणि शर्ती नीट वाचून घ्या. जवळच्या लोकांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल.
सिंह: आर्थिक प्रश्न सुटतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने हा कालखंड चांगला राहील. वसुलीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. व्यवहारात स्पष्टता ठेवा. सुरुवातीला मोहाच्या जाळ्यात अडकले जाणार नाही, याची काळजी घ्या. व्यक्तिमत्त्वात विलक्षण बदल होतील. आरोग्य चांगले राहील. मोठ्या उत्साहाने कामे कराल, आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू प्राप्त होतील. लोकांकडून तुम्हाला मान मिळेल.
कन्या: एखाद्या कामासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. ऐनवेळी काही अडचणी येतील. लोकांच्या मदतीसाठी जावे लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळा. इतरांच्या अडचणींचा स्वतःला त्रास करून घेऊ नका. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.
तूळ: संयमाने वागण्याची गरज आहे. कुणी आश्वासन दिले, म्हणून लगेच हुरळून जाऊ नका. आर्थिक व्यवहार जपून करा. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. प्रवास शक्यतो टाळा. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. अनुकूलता अनुभवायला मिळेल. अडचणी दूर होतील. मन आनंदी राहील. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.
वृश्चिक: संयमाची परीक्षा पाहिली जाईल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. फायदे होतील; पण कामाचा ताण राहील. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घ्यावी. लोकांच्या क्षमतांचा विचार करून त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवाव्यात, याचा विचार करा. खर्च आवरा. एखाद्या उलाढालीत व्यस्त राहाल. शनिवारी मोकळा वेळ मिळेल. मोहापासून दूर राहा.
धनु: नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. काही लोक विरोधात कारवाया करतील. नेहमीची कामे वेळच्या वेळी करा. लोकांना उत्तरे देण्यात वेळ वाया घालवू नका. घरात काही कारणाने तणाव राहू शकतो. संशयाचे वातावरण राहील. पण ते फार काळ टिकणार नाही. उत्तरार्धात अचानक मोठ्या प्रमाणावर पैसा मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. योजनांच्या माध्यमातून यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर: पगारवाढ मिळेल. दिवस मनासारखे जातील. कामांची घाई करू नका. आठवडाभरात काय कामे करायची आहेत, याचे नियोजन करण्यात स्वतःला व्यस्त ठेवा. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. चांगले अनुभव येतील. नोकरीत पगारवाढ व नवीन संधी मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.
कुंभ: जपून वागा. संयमाने वागण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. कुणाचे ऐकून मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. त्यातून कदाचित मोठा फटका बसू शकतो. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. वाहने जपून चालवा, अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. अनुकूलता अनुभवायला मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. समाजात महत्त्व वाढेल. पुरस्कार जाहीर होतील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल.
मीन: संयमाने वागण्याची गरज आहे. इतरांच्या भानगडीत पडू नका. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. कुणी काही प्रस्ताव ठेवला तर हुरळून जाऊन चटकन निर्णय घेऊ नका. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शनिवारी अनुकूलता राहील.