३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 07:07 IST2025-09-24T07:07:07+5:302025-09-24T07:07:07+5:30
Navratri 2025 Dhan Mahalaxmi Yog: नवरात्रातील शुभ योगांच्या या कालावधीत कोणत्या राशींना सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च लाभ प्राप्त होऊ शकतील, तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

Dhan Mahalaxmi Yog Navratri 2025: नवरात्र उत्सव सुरू आहे. २२ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सवाची धूम असणार आहे. दुर्गा देवीच्या उपासनेसाठी नवरात्राचा काळ अत्यंत शुभ तसेच पुण्य फलदायी मानला जातो. या कालावधीत अधिकाधिक देवीची उपासना केली जाते. आगामी काही दिवसांत शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगांचा सकारात्मक प्रभाव अनेक राशींवर पडू शकतो.
मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री चंद्राने कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश केला आहे. तूळ राशीत नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह विराजमान आहे. त्यामुळे चंद्र आणि मंगळाच्या युतीने धन योग, महालक्ष्मी योग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी ललिता पंचमी असून, दुपारनंतर चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
तसेच नवमपंचम, अर्धकेंद्र योग, समसप्तक योग असेही काही चांगले योग याच काळात जुळून आलेले आहेत. या सर्व ग्रहांच्या गोचराने तयार झालेल्या उत्तम योगांचा सर्वोत्तम प्रभाव काही राशींवर पडणार आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...
वृषभ: अर्धकेंद्र योग जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये फायदेशीर ठरू शकतो. जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंददायी राहील. वैवाहिक जीवन गोड आणि आनंदी होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळू शकेल. दीर्घकालीन समस्या संपतील.
मिथुन: नवपंचम राजयोगामुळे अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. परदेशातून मोठा नफा मिळू शकतो. व्यवसायात अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. शेअर बाजारातून पैसे कमवू शकता. जोडीदाराशीसोबत एकत्र चांगला वेळ घालवू शकाल.
कर्क: महालक्ष्मी राजयोगाने अच्छे दिन सुरू होऊ शकतात. सुखसोयी आणि विलासिता वाढतील. विरोधक परास्त होतील. व्यावसायिकांना मानसिक शांतता लाभू शकेल. तरुणांसाठी ध्येय साध्य करण्याचा मार्ग सोपा होईल. समाजात एक नवीन ओळख मिळेल. मालमत्ता आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतलेल्यांना लक्षणीय नफा मिळू शकेल. सासू-सासऱ्यांशी नाते मजबूत राहील. अडकलेले पैसे मिळू शकतील. व्यापाऱ्यांना नवीन ऑर्डर मिळून धनलाभ होऊ शकेल. करिअरमध्ये सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकतील.
सिंह: अर्धकेंद्र योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. या योगाच्या प्रभावामुळे जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास आणि धैर्यात लक्षणीय वाढ होईल, ज्यामुळे मोठे निर्णय घेण्यास आणि जोखीम घेण्यास अधिक सक्षम व्हाल. हा आत्मविश्वास स्पर्धा आणि आव्हानांवर मात करण्यास मदत करू शकेल.
कन्या: महालक्ष्मी तसेच नवमपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतात. प्रभाव वाढेल. लोक प्रभावित होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. बढतीमुळे नोकरी करणाऱ्यांचे मन प्रसन्न होईल. ते परिश्रमपूर्वक काम करतील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होऊ शकेल. नवीन जबाबदारी मिळू शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल.
धनु: अर्धकेंद्र योग अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ ठरू शकतो. हा काळ भाग्यवान आणि नवीन संधींनी भरलेला असेल. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. मोठी आणि महत्त्वाची कामे सहजतेने पूर्ण करू शकाल. परदेश प्रवासाची संधी प्राप्त होऊ शकेल. यामुळे भविष्यातील प्रगती आणि नवीन संधींचा मार्गही मोकळा होऊ शकेल. परदेशात शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरेल.
मकर: नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो. व्यावसायिकांना लक्षणीय धनलाभ होऊ शकतो. जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्षणीय यश मिळू शकेल. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. अध्यात्म आणि धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि कमाई वाढेल. एकूणच, हा काळ बहुआयामी ठरू शकेल.
कुंभ: महालक्ष्मी राजयोग सकारात्मक ठरू शकतो. नशिबाची, भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये चांगले निकाल मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. भांडवली गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. संधींचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल. पैशांची बचत करणे शक्य होऊ शकेल. अच्छे दिन सुरू होऊ शकतील. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
मीन: नशिबाची, भाग्याची साथ लाभू शकेल. असे वाटेल की, दैवी कृपेचा लाभ होत आहे. काम कमीत कमी प्रयत्नात पूर्ण होईल. घरातील वातावरण सकारात्मक, आनंददायी असू शकेल. अशा स्रोतातून नफा मिळवण्याची संधी निर्माण करेल ज्याची कधीही अपेक्षा केली नसेल. वडिलांकडून लाभ मिळू शकतो. वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. धार्मिक कार्यात रस असेल. व्यवसायात नवीन योजना सुरू करून पैसे कमवू शकाल. भेटवस्तू, मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.