शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

२६ दिवस शुक्राचा पंचमहापुरुष राजयोग: ६ राशींना अनपेक्षित लाभ, धनप्राप्ती; पण, दगदग-वाद टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 06:03 IST

1 / 15
एप्रिल महिन्यात ज्योतिषशास्त्रानुसार अनेक राजयोग, शुभ योग जुळून आले आहेत. सूर्य ग्रह उच्च रास म्हणजेच मेष राशीत विराजमान आहे. तर, शुक्र ग्रह स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत विराजमान आहे. शुक्र स्वराशीत विराजमान असल्यामुळे एक अतिशय शुभ मानला गेलेला राजयोग जुळून आलेला आहे.
2 / 15
शुक्र ग्रह वृषभ राशीत असल्यामुळे मालव्य नावाचा एक राजयोग जुळून आलेला आहे. पंचमहापुरुष राजयोगांपैकी हा एक महत्त्वाचा राजयोग मानला गेला आहे. १४ मे २०२६ पर्यंत हा राजयोग कायम राहणार आहे. या राजयोगाचा अनेक राशींना चांगला लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
3 / 15
शुक्र ग्रह स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत असल्याचा अनेक राशींना कुटुंब, व्यवसाय, व्यापार, नोकरी, आर्थिक आघाडीवर सकारात्मक अनुकूलता लाभू शकेल, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...
4 / 15
मेष: काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. मनातील काळजीचे विचार प्रयत्नपूर्वक काढून टाकले पाहिजेत, तरच यशाची मधुर फळे चाखता येतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काही अनपेक्षित लाभ होतील. ज्येष्ठ मंडळींचा मान राखा. भावंडांशी सख्य राहील. व्यवसायात भरभराट होईल. जवळच्या प्रवासाचे योग येईल. आर्थिक गुंतवणूक करताना मात्र थोडे जागरूक राहा. नोकरीत काही बदल होऊ शकतात. घरी पाहुणे मंडळी येतील.
5 / 15
वृषभ: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. खर्च आटोक्यात येऊन हाती पैसा शिल्लक राहील. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळतील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. सहलीला जाऊन याल. मात्र, नियमानुसार कामे करा.
6 / 15
मिथुन: यशदायक काळ ठरेल. काही कारणांमुळे वेळ वाया जाईल. त्यामुळे चुटपूट लागून राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. परिस्थिती आटोक्यात येईल. विवाह जुळण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. प्रेम प्रकरणे यशस्वी होतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरदारांनी वादात पडू नये.
7 / 15
कर्क: चिंता दूर होईल. पैसा मिळेल आणि तो खर्चही होईल. कार्यक्षेत्रात बाजू वरचढ राहील. सहकारी वर्गाशी चांगले संबंध राहतील. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. भेटवस्तू प्राप्त होतील. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. धार्मिक कार्याच्या निमित्ताने प्रवास होतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. अनुकूलता अनुभवायला मिळेल. मनात आनंदी विचार राहतील.
8 / 15
सिंह: कामाची घाई नको. प्रलंबित कामे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल. मात्र, फार घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहने जपून चालवा आणि वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्यावे. नोकरीत नवीन संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. स्त्री वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. एखाद्या उलाढालीत आर्थिक लाभ होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
9 / 15
कन्या: ग्रहमान अनुकूल राहील. चंद्राचे भ्रमण फायदेशीर ठरेल. ठरवलेली कामे सोप्या पद्धतीने होतील. मौजमजा, नोकरीतील फायदेशीर बदल, धनप्राप्ती इत्यादी दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. काहींना मौजमजा करण्यासाठी प्रवास घडून येतील. समाजात महत्त्व वाढेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल.
10 / 15
तूळ: समाजात मान वाढेल. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीशी वाद टाळा. परिस्थिती आटोक्यात येईल. मनात सकारात्मक विचार राहतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत अनुकूल बदल होतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
11 / 15
वृश्चिक: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. कामाचा ताण असला तरी नियोजनबद्ध पद्धतीने कामे करून परिस्थिती जिंकू शकता. जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. शांत चित्ताने कामे करा. वाहने हळू चालवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. सामाजिक मान-सन्मान मिळेल. मुलांशी गैरसमज होतील.
12 / 15
धनु: दगदग करू नका. साधक-बाधक अनुभव येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. घरगुती जबाबदाऱ्यांचा ताण राहील. नोकरीत सुरुवातीला काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. विवाह जुळण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. वाहने जपून चालवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.
13 / 15
मकर: आक्रमक धोरण नको. किरकोळ कारणावरून जवळच्या लोकांशी गैरसमज व त्यातून वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यामुळे मिळणाऱ्या यशाचा खराखुरा आनंद तुम्हाला घेता येईल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. मात्र त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. जवळच्या प्रवासाचे योग येतील. उत्तरार्धात खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. जीवनसाथीशी सूर जुळतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील.
14 / 15
कुंभ: मुलांना यश मिळेल. चंद्र भ्रमणाची अनुकूल फळे मिळतील. मात्र वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. उलट उत्तरे देऊ नका. जमिनीच्या व्यवहारात सावधपणे निर्णय घ्या. नोकरीत सुख-सोयी वाढवून मिळतील. कामातील बदल सुखावह ठरतील. घरात मंगलमय वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. मुलांचे यश सुखावून जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल. जवळचे प्रवास होतील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. योजना गुप्त ठेवा.
15 / 15
मीन: सुख-सोयी वाढवून मिळतील: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. मनात सकारात्मक विचार असतील तरच निर्भेळ यशाचा आनंद लुटता येईल. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा. मनातील भावना कुणाला सांगायच्या आणि कुणाला नाही सांगायच्या याचा विचार करा. व्यवसायात भरभराट होईल. मात्र आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक