जाणून घ्या, दाढी वाढवण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:49 IST2019-02-18T14:44:58+5:302019-02-18T14:49:56+5:30

तरुणपिढीमध्ये हल्ला दाढी वाढवण्याचा नवाच ट्रेंड सुरू झालाय. अगदी टीनेजरपासून बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत दाढी वाढवण्याचं फॅड आलंय.
दाढी वाढवण्याचे अनेक फायदे असल्याचं संशोधनातून उघड झालंय. दाढी वाढवल्यामुळे अनेक रोगांपासून आपला बचाव होत असल्याचं समोर आलं आहे.
सूर्याच्या किरणांनी चेहराच्या त्वचेचा नुकसान होतं. परंतु दाढी असल्यानं कारणानं सूर्याची किरणं त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत.
तसेच दाढीमुळे चेहऱ्याला संरक्षण मिळत असून, जंतुसंसर्गापासूनही बचाव होतो. तसेच दाढी असल्यानं अॅलर्जी आणि अस्थमा होत नाही.
दाढी वाढवल्यामुळे चेहऱ्यावर मुरमं आणि डाग पडत नाही. तसेच चेहऱ्याची त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते.