पाठीवर पिंपल्स त्रासदायक ठरतायत?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 19:32 IST2019-04-13T19:27:52+5:302019-04-13T19:32:32+5:30

अनेकांना विविध कारणांमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचा सामना करावा लागतो. काही लोकांना फक्त चेबऱ्यावरच नाही तर पाठीवरही पिंपल्स येतात. एवढचं नाही तर ते फार मोठे आणि वेदनादायी असतात. असं शरीरातील काही हार्मोन्समुळे होत असतं. जे अधिक सीबम तयार करतात. तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागतो असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून सुटाका करून घेऊ शकता.
कोरफड
आंघोळ केल्यानंतर कोरफडीचा गर पाठीवर लावा. त्यामुळे पाठवरील चट्टे, डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये गुलाब पाणी आणि मध एकत्र करा. तयार पेस्टच्या मदतीने हलक्या हाताने स्क्रब करा आणि गरम पाण्याने पाठ धुवून स्वच्छ करा. पुढेचे काही तास पाठीवर साबण लावू नका. 10 ते 12 दिवस हा उपाय ट्राय केल्याने पाठीवरील पिंपल्स दूर करण्यासाठी मदत होते.
हळद
तीन चमचे हळद आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट रात्री पाठीवर लावा. सकाळी गरम पाणी आमि मेडिकेटेड साबणाच्या वापराने आंघोळ करा. असं दोन आठवड्यांसाठी केल्यानंतर फायदा होइल.
मुलतानी माती
एक चमचा मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी आणि एक चमचा चंदनाची पावडर एकत्र करा. तयार पेस्ट संपूर्ण पाठीवर लावा. साधारणतः अर्ध्या तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा. उन्हाळ्यामध्ये हा पॅक दर दोन दिवसांनी लावा.