Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 20:44 IST2025-07-05T20:40:21+5:302025-07-05T20:44:25+5:30

Bajaj Dominar: बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची लोकप्रिय स्पोर्ट्स टूरिंग मोटारसायकल डोमिनार ४०० आणि २५० लॉन्च केली आहेत .

बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची लोकप्रिय स्पोर्ट्स टूरिंग मोटरसायकल डोमिनार ४०० आणि डोमिनार २५० बाजारात लॉन्च केली आहेत. अपडेटनंतर या मोटारसायकलमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक फीचर्स देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या राइड्ससाठी या मोटारसायकल आरामदायी आहेत.

कंपनीने डोमिनार ४०० ची एक्स-शोरूम किंमत २ लाख ३८ हजार ६८२ रुपये निश्चित केली. तर डोमिनार २५० ची एक्स-शोरूम किंमत १ लाख ९१ हजार ६५४ रुपये आहे. हे दोन्ही मॉडेल देशभरातील बजाज शोरूममधून खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

नवीन डोमिनार ४०० मध्ये आता राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी मिळत आहे. यासोबतच, रोड, रेन, स्पोर्ट आणि ऑफ-रोड असे ४ रायडिंग मोड देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून रायडरला वेगवेगळ्या परिस्थितीत सुरक्षितपणे मोटारसायकल चालवता येईल.

नवीन डोमिनार २५० मध्ये चार एबीएस राईड मोड्स देण्यात आले आहेत, जे मेकॅनिकल थ्रॉटल बॉडीपासून चालतात. कंपनीने अपडेटेड २०२५ डोमिनार मॉडेलला एक परिपूर्ण टूरिंग मशीन म्हणून सादर करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

आता या मोटरसायकलमध्ये नवीन बॉन्डेड ग्लास एलसीडी स्पीडोमीटर, पुन्हा डिझाइन केलेले हँडलबार, जीपीएस माउंटसह कॅरियर आणि प्रगत नियंत्रण स्विच अशा अनेक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे लांबचा प्रवास आणखी सोपा होईल.

डोमिनार ४०० मध्ये ३७३.५ सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन पूर्वीप्रमाणेच ४०पीएस पॉवर आणि ३५ एनएम टॉर्क जनरेट करते. यावेळी ही मोटारसायकल कॅन्यन रेड कलर पर्यायासह बाजारात दाखल झाली आहे.