Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:40 IST2025-07-06T14:35:28+5:302025-07-06T14:40:28+5:30
Tata Harrier EV ची बुकिंग २ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे.

Tata Harrier EV Bookings: टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही Harrier EV लॉन्च केली आहे. लॉन्च झाल्यापासून या गाडीला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने २ जुलै २०२५ पासून बुकिंग सुरू केले अन् अवघ्या २४ तासांत या SUV चे १०,००० हून युनिट्स बुक झाले आहेत.
हा आकडा केवळ टाटासाठीच नाही, तर भारतातील EV बाजारपेठेसाठीही एक मोठी उपलब्धी आहे. यापूर्वी, लॉन्चच्या दिवशी फक्त Mahindra XUV 9e ला जास्त बुकिंग (१६,९००) मिळाली होती. हॅरियर ईव्हीची डिलिव्हरी जुलै २०२५ च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.
Harrier EV बॅटरी आणि रेंज- टाटा हॅरियर ईव्ही दोन बॅटरी पर्यायांमध्ये (६५ kWh आणि ७५ kWh) येते. ६५ केडब्ल्यूएच बॅटरी असलेल्या व्हेरिएंटमध्ये रेंज ५३८ किमीची आहे, तर ७५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक ६२७ किमी पर्यंतची रेंज देतो.
याच्या QWD (ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह) व्हेरिएंटमध्ये ७५ kWh बॅटरी वापरली जाते. यामध्ये, फ्रंट मोटर १५८ PS आणि मागील मोटर २३८ PS ची पॉवर एकत्र करून एकूण ५०४ Nm टॉर्क जनरेट करते.
RWD व्हेरिएंट २३८ PS पॉवर आणि ३१५ Nm टॉर्क मिळतो. ड्रायव्हिंग मोड्सबद्दल बोलायचे झाले तर, RWD व्हेरिएंटमध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट मोड्स उपलब्ध आहेत, तर QWD प्रकारात या सर्वांव्यतिरिक्त अतिरिक्त बूस्ट मोड देखील आहे.
हॅरियर EV चे फिचर्स- टाटा हॅरियर EV चे डिझाईन फ्युचरिस्टीक आणि स्मार्ट बनवण्यात आले आहे. याच्या इंटीरियरमध्ये ड्युअल-टोन कलर स्कीम आणि प्रीमियम फिनिश आहे, जे त्याला लक्झरी फील देतात.
हॅरियर ईव्हीमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि अँबियंट लाइटिंग सारखे फिचर्स आहेत, ज्यामध्ये कीलेस एंट्री आणि फोन अॅक्सेसद्वारे कारमध्ये एंट्री घेता येते. ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी त्यात ५४०-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा आणि ई-आयआरव्हीएम (इलेक्ट्रॉनिक इनसाइड रीअर व्ह्यू मिरर) सारखी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत.
हॅरियर ईव्हीमध्ये लेव्हल-२ एडीएएस (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) मिळतो, जे कारची सुरक्षितता आणखी सुधारते. याशिवाय, कारमध्ये ओटीए अपडेट्स, इन-कार पेमेंट सिस्टम, रेंज पॉलीगॉन, व्ही२एल (वाहन ते लोड) आणि व्ही२व्ही सपोर्ट सारखी आधुनिक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये देखील आहेत.
टाटा हॅरियर ईव्ही भारतीय बाजारात प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून सादर करण्यात आली आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत २१.४९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ३०.२३ लाख रुपयांपर्यंत जाते.
या किमतीत टाटाने फक्त आकर्षिक लुक असलेली कार आणली नाही, तर त्यात लांब बॅटरी रेंज, उच्च कार्यक्षमता आणि भरपूर फिचर्सदेखील आहेत. ही एसयूव्ही अशा ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे, ज्यांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लक्झरी, पॉवर आणि स्टाइल हवी आहे.