Royal Enfield लाँच करणार नवी Bullet, समोर आली महत्त्वाची माहिती; पाहा Unseen Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 02:13 PM2022-09-23T14:13:49+5:302022-09-23T14:22:31+5:30

रॉयल एनफिल्डने आनुकतीच नवीन Hunter 350 मोटरसायकल देशात लाँच केली आहे. आता कंपनी पुन्हा एकदा 350cc आणि 650cc मध्ये धमाका करण्याच्या तयारीत आहे.

रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) नुकतीच नवीन Hunter 350 मोटरसायकल देशात लाँच केली आहे. ही ब्रँडची सर्वात हलकी आणि परवडणारी मोटरसायकल आहे ज्याची किंमत 1.50 लाख रुपयांपासून सुरू आहे.

कंपनी दोन नवीन 650cc बाईक, नवीन हिमालयन 450 आणि न्यू जनरेशनच्या बुलेटसह अनेक नवीन मोटरसायकल विकसित करत आहे. नवीन रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 आणि नवीन बुलेट 350 पुढील काही महिन्यांत लाँच होण्याची शक्यता आहे. या बाईक 2023 च्या सुरुवातीला बाजारात लाँच केल्या जाऊ शकतात.

न्यू जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 चं प्रोडक्शन रेडी व्हर्जन चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिलं गेलं आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही बाईक लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन Bullet 350 नवीन Royal Enfield च्या "J" प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.

नवीन बुलेटमध्ये 346cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात येईल जे 20.2 bhp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते. मोटर 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडली जाईल. नवीन बुलेट 350 मध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक ॲब्झॉर्बर्स असतील. बाईकला सिंगल-चॅनल एबीएस सिस्टमसह फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक्स मिळतील.

कंपनी नवीन Shotgun 650 ची चाचणी भारतीय रस्त्यावर अतिशय जलद आणि कोणत्याही अॅक्सेसरीजशिवाय करत आहे. नोव्हेंबरमध्ये ती EICMA 2022 मध्ये येणे अपेक्षित आहे. मोटारसायकल GG650 क्रूझर डिझाइनसह येऊ शकते. हे रॉयल एनफिल्डच्या 650cc प्लॅटफॉर्मवर डिझाइन आणि विकसित केले गेले आहे.

हंटर प्रमाणे, नवीन शॉटगन 650 अनेक व्हेरिअंट्समध्ये ऑफर केली जाईल. याशिवाय रॉयल एनफिल्ड नवीन बाईकसोबत अनेक अॅक्सेसरीज देखील सादर करू शकते. या बाईकमध्ये 648cc, पॅरलल-ट्विन, एअर-अँड-ऑइल-कूल्ड इंजिनद्वारे असण्याची शक्यता असून ते 47bhp ची पॉवर आणि 52Nm टॉर्क जनरेट करू शकते. मोटारसायकलला ड्युअल चॅनल ABS सिस्टीम USD फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल डिस्क ब्रेक्सही देण्यात येतील.