Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:56 IST2025-07-03T15:52:50+5:302025-07-03T15:56:55+5:30

Royal Enfield Bikes: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने पुन्हा एकदा रॉयल एनफिल्ड स्कॅम ४४० बाईकची विक्री सुरू केली. काही महिन्यांपूर्वी या बाईकची विक्री बंद झाली होती.

कंपनीने काही महिन्यांपूर्वी रॉयल एनफील्ड स्कॅम ४४० ही बाईक लॉन्च केली होती, जी रॉयल एनफील्ड स्कॅम ४११ चे अपडेट व्हर्जन आहे. नव्या बाईकमध्ये जास्त डिस्प्लेसमेंट असलेले इंजिन मिळेल

रॉयल एनफील्ड स्कॅम ४४० या बाईक लॉन्च झाल्यानंतर लगेचच कंपनीला यांत्रिक समस्यांमुळे त्याची विक्री तात्पुरती थांबवावी लागली.

कंपनीने दावा केली आहे की सर्व तांत्रिक समस्यांचे निवारण करण्यात आले आहे आणि स्क्रॅम ४४० पुन्हा बाजारात उपलब्ध होत आहे. बाईकची उपलब्धता अजूनही मर्यादित आहे. परंतु, रॉयल एनफिल्ड हळूहळू उत्पादन वाढवत आहे.

जर तुम्ही स्क्रॅम ४४० खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच डीलरशिपशी संपर्क साधा. त्यामागचे कारण म्हणजे कंपनी सुरुवातीला मर्यादीत बाईकची विक्री केली जाणार आहे.