Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 06:24 PM2021-07-25T18:24:14+5:302021-07-25T18:32:19+5:30

What will be the Ola Electric Scooter Range, Price: आता लोकांना उत्सुकता आहे ती, ही स्कूटर कधी लाँच होणार, किंमत किती असणार आणि काय काय फिचर्स मिळणार, याची. चला जाणून घेऊया, स्कूटर खरेदीच्या या नव्या ट्रेंडबाबत.

Ola Electric Scooter - Marathi News | Ola Electric Scooter | Latest auto Photos at Lokmat.com

ओला ईलेक्ट्रीक स्कूटरने येण्याआधीच भारतीय बाजारात मोठा कल्लोळ माजविला आहे. ग्राहक आगाऊ बुकिंगवर एवढे तुटून पडले की, पहिल्याच दिवशी 1 लाखांचा आकडा पास झाला होता. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बुकिंग मिळविणारी ही जगातील पहिलेच वाहन ठरले आहे. (OLA ELECTRIC SERIES S E-SCOOTER SET TO HAVE RANGE OF UP TO 150 KILOMETRES, FIXED BATTERIES)

आता लोकांना उत्सुकता आहे ती, ही स्कूटर कधी लाँच होणार, किंमत किती असणार आणि काय काय फिचर्स मिळणार, याची. चला जाणून घेऊया, स्कूटर खरेदीच्या या नव्या ट्रेंडबाबत.(Ola Electric Scooter Home Delivery)

Ola Scooter लवकरच लाँच केली जाणार आहे. तसेच या स्कूटरचा कोणताही डीलर नेमण्यात येणार नाहीय. म्हणजेच तुमच्या आजुबाजुला या स्कूटरचे शोरुम नसणार आहे. यामुळे ही स्कूटर थेट घरी डिलिव्हर केली जाणार आहे.

फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार Ola Electric आपल्या Series-S स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी ‘डायरेक्ट-2-कंज्यूमर’ (D2C) मॉडेल अवलंबणार आहे. थेट ग्राहकाच्या घरी नेऊन ही स्कूटर दिली जाणार आहे.

महत्वाचे म्हणजे Ola Electric व्हेईकल मॅन्युफॅक्चरर कंपनी नाही तर टेक मोबिलिटी स्टार्टअप म्हणून संबोधत आहे. ओला स्कूटर केवळ घरी डिलिव्हर केली जाणार नाही, तर पुढच्या सर्व्हिसेस देखील दारातच येऊन दिल्या जाणार आहेत. यामुळे डीलरशीपचे पैसे वाचणार आहेत.

Ola Scooter च्या डोअरस्टेप डिलिव्हरीसाठी Ola Electric वेगळे लॉजिस्टिक डिपार्टमेंट बनविणार आहे. हा विभाग ग्राहकांसाठी थेट खरेदी, डॉक्युमेंटेशन आणि कर्जासह अन्य सुविधा पुरविणार आहे.

लक्झरी कार बनविणारी कंपनी Mercedes-Benz आणि Jaguar Land Rover ने नुकतीच कारची होम डिलिव्हरी सुरु केली आहे. मात्र, ओला ही अशी पहिलीच कंपनी ठरणार आहे, जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर होम डिलिव्हरी मॉडेल वापरणार आहे.

Ola Scooter ची दोन मॉडेल बॅटरी पॅकनुसार बाजारात येण्याची शक्यता आहे. Ola S1 आणि Ola S2 अशी ही दोन मॉडेल आहेत. यांची किंमत 80 हजार आणि 1.10 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.

ओलाचा बंगळरुमध्ये जगातील ईस्कूटरचा सर्वात मोठा कारखाना उभा राहणार आहे. 500 एकर जमिनीवर 2,400 कोटी रुपये खर्च करून ही फॅक्टरी उभी केली जात आहे. यामध्ये वर्षाला 2 लाख स्कूटरचे उत्पादन केले जाणार आहे.

ओलाची ही स्कूटर Etergo AppScooter वर आधारीत असे. या स्कूटरमध्ये उच्च क्षमतेची स्वॅपेबल बॅटरी येते. परंतू ओलामध्ये एकच फिक्स बॅटरी असेल. तसेच 240 किमीची रेंज सांगतिली जात असली तरी प्रत्यक्षात 150 किमीची रेंज मिळण्याची शक्यता आहे.

ओला स्कूटरला चार्ज करण्यासाठी ओला स्टेशनवर अडीच तास, घरी केल्यास पाच तास लागण्याची शक्यता आहे. तसेच हायपर चार्जिंग स्टेशनवर बॅचरी केवळ 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार आहे.