Nitin Gadkari: नितीन गडकरींना कंपन्यांपेक्षा कार मालकांची चिंता; म्हणाले, 'सहा एअरबॅग द्या', पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 01:25 PM2021-08-05T13:25:01+5:302021-08-05T13:31:03+5:30

Nitin Gadkari 6 Airbags compulsory: अमेरिकेत जगातील सर्वात अपघात होतात, भारतात अमेरिकेपेक्षा कमी अपघात होत असले तरी मृत्यूंची संख्या जगात सर्वाधिक आहे. यामुळे कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेकडे गडकरींनी लक्ष देण्याची सूचना केली आहे.

कंपन्यांना इंधन वाचविण्यासाठी फ्लेक्स इंजिनच्या गाड्या वर्षभरात आणा, असा आदेश दिलेला असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) प्रवाशांच्या सुरक्षेवरूनही (Pasanger Safty) कंपन्यांचे कान टोचले आहेत. सरकारने बंधनकारक केले म्हणून दोन एअरबॅग देण्यास सुरुवात केली. परंतू त्या पुरेशा नाहीत, कमीतकमी सहा एअर बॅग असायला हव्यात असे गडकरी यांनी म्हटले आहे. (Make Minimum 6 airbags standard in all cars; nitin Gadkari Appeal ti Siam meeting.)

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री (MORTH) नितीन गडकरी यांनी मंगळवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली.

महत्वाचे म्हणजे जानेवारी २०२१ मध्ये गोव्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला कर्नाटकमध्ये अपघात झाला होता. नाईक यांना गंभीर दुखापत झाली होती. तर त्यांच्या पत्नीचा आणि एका जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

सर्वात धक्कादायक म्हणजे अमेरिकेत जगातील सर्वात अपघात होतात, भारतात अमेरिकेपेक्षा कमी अपघात होत असले तरी मृत्यूंची संख्या जगात सर्वाधिक आहे. यामुळे कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेकडे गडकरींनी लक्ष देण्याची सूचना केली आहे. (Nitin Gadkari bats for 6 airbags in cars as compulsory)

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व वाहन निर्माता कंपन्यांनी बेस व्हेरिअंटपासून कमीतकमी सहा एअरबॅग त्यांच्या वाहनांमध्ये द्याव्यात अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरी यांनी फक्त कंपन्यांना विनंती केली असून सरकारचा 6 एअरबॅग बंधनकारक करण्याचा कोणताही विचार नाही, हे महत्वाचे. (Give 6 airbags in Cars.)

1 जुलै, 2019 पासून ड्रायव्हरसाठी एअरबॅग बंधनकारक करण्यात आली होती. तर 1 एप्रिलपासून पुढे बसणाऱ्या प्रवाशालादेखील एअरबॅग असणे बंधनकारक करण्यात आले होते. ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे. भारतात काही कंपन्यांच्या कार सहा एअरबॅग देखील ऑफर करतात, मात्र, त्या कार टॉप व्हेरिअंट असतात.

अतिरिक्त एअरबॅग असणे हे वाहनाचा अपघात झाला तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फायद्याचे असते. मात्र, या अतिरिक्त एअरबॅग देणे आव्हानात्मकही आहे. खासकरून बजेट सेगमेंटमध्ये.

एन्ट्री लेव्हल कारमध्ये पुढील एक एअरबॅग 5 ते 10 हजार रुपयांना पडते. तर साईड कर्टन एअरबॅगचा खर्च हा त्याच्या दुप्पट असतो.

बेस ते सेकंड टॉप व्हेरिअंटमध्ये तीन ते सहा एअरबॅग बसविण्यासाठी तशी सोय केलेली नसते. यासाठी रुफ पासून आतील फोम, इंटेरिअरमध्ये बदल करावा लागणार आहे. याचबरोबर बॉडीमध्ये देखील बदल करावा लागेल. कारण तसे न केल्यास एअरबॅग अपघातावेळी उघडणार नाहीत किंवा चुकीच्या वेळी, चुकीच्या पद्धतीने उघडतील.

काही कारचे प्लॅटफॉर्म आणि बॉडी शेल त्यासाठी डिझाईन केलेले नाहीएत. कारण कंपन्यांना सरकारी नियमानुसार दोनच एअरबॅग द्यायच्या असतात. मग उगाचच ती सोय करण्याचे कष्ट कंपन्यांनी घेतलेले नाहीत. यामुळे सहा एअरबॅगसाठी पुढील जनरेशनच्या लाँचिंगची वाट पहावी लागणार आहे.

काही कंपन्या सहा एअरबॅग ऑफर करतात. मात्र, त्या टॉप व्हेरिअंटमध्ये असतात. कार घेणारा ग्राहक हा बजेट फ्रेंडली कार पाहतो. यामुळे त्यांच्या कार पाण्यासारख्या खपतात. जर सहा एअरबॅगचे ५० हजार रुपये जरी वाढले तरी आधीच कारच्या वाढलेल्या किंमती आणि त्यात ही वाढ कंपन्यांसह ग्राहकांनाही परवडणारी नसेल.