बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 02:54 PM2024-05-17T14:54:00+5:302024-05-17T14:54:45+5:30

Prabhas: अलिकडेच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुचक वक्तव्य केलं असून नेटकऱ्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

prabhas-cryptic-post-create-suspense-for-someone-special-come-in-his-real-life | बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

 दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याची सोशल मीडियावर तुफान क्रेझ आहे. एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमातून त्याने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. प्रभास लवकरच 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या नाग अश्विन दिग्दर्शित सिनेमात झळकणार आहे. प्रभास त्याच्या सिनेमांसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत येत असतो. यात खासकरुन तो लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडतो. यामध्येच प्रभासची एक सूचक पोस्ट चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर प्रभास प्रचंड अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे तो त्याच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्याचे अपडेट शेअर करत असतो. यात  अलिकडेच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुचक वक्तव्य केलं असून नेटकऱ्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

डार्लिंग...अखेर माझ्या आयुष्यात एक खास व्यक्ती येणार आहे. त्याची वाट पाहा, असं कॅप्शन देत प्रभासने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांचा सस्पेन्स वाढला आहे. त्यामुळे बाहुबलीच्या आयुष्यात देवसेनाची एन्ट्री होणार का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

दरम्यान, चाहते प्रभासच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी प्रभासचं नाव 'आदिपुरुष' फेम क्रिती सेनॉनसोबत जोडलं गेलं होतं. परंतु, या अफवा असल्याचं समोर आलं होतं.

Web Title: prabhas-cryptic-post-create-suspense-for-someone-special-come-in-his-real-life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.