Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:38 IST2025-07-01T17:33:46+5:302025-07-01T17:38:44+5:30

Electric Scooter TVS iQube: टीव्हीएस मोटर्सची इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूबची सलग तीन महिने सर्वाधिक विक्री झाली.

टीव्हीएस मोटर्सची इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूब मोठी पसंती मिळवली असून ही देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. सलग तीन महिने या स्कूटरची सर्वाधिक विक्री झाली.

आयक्यूबच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी कंपनीने या इलेक्ट्रीक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे, ज्याची बॅटरी क्षमता ३.१ किलोवॅट आहे. ही इलेक्ट्रीक स्कूटर एका चार्जमध्ये १२१ किलोमीटर धावेल.

या इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड ८२ किलोमीटर इतकी आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. तसेच फीचर्समध्ये कोणाताही बदल करण्यात आला नाही.

ही इलेक्ट्रीक स्कूटर पांढरा, तपकरी, राखाडी, तांबडा आणि निळ्या अशा पाच रंगामध्ये बाजारात दाखल होईल.

टीव्हीएस आयक्यूबच्या नव्या व्हेरिएंटच्या बेस आणि टॉप मॉडेलची किंमत अनुक्रमे १.०१ लाख आणि १.३१ हजार इतकी आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची स्पर्धा बाजारात उपलब्ध असलेल्या बजाज चेतकशी असेल.