MG Comet EV Vs Tata Tiago EV: एमजीची कॉमेट की टाटाची टियागो ईव्ही? कोणत्या कारमध्ये काय मिळते... एका क्लिकमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 05:56 PM2023-04-26T17:56:00+5:302023-04-26T18:00:35+5:30

एमजी कॉमेटची सुरुवातीची किंमत आठ लाखांच्यात आत... आज लाँच, कोणती कोणती फिचर्स... जाणून घ्या...

भारतीय बाजारात आता कमी किंमतीतल्या ईलेक्ट्रीक कारसाठी स्पर्धा सुरु झाली आहे. टाटा मोटर्सची आतापर्यंतची स्वस्त समजली जाणारी टियागो ईव्हीला टक्कर देण्यासाठी एमजीने कॉमेट ईव्ही लाँच केली आहे.

दोन दरवाजे आणि ४ जण बसू शकतील अशी जागा या कारमध्ये आहे. टियागो इतर सामान्य कारसारखी असली तरी कॉमेट मात्र वेगळ्या धाटणीची आहे. या दोघांमध्ये काय फरक आहे, चला जाणून घेऊयात.

दोन्ही कारच्या किंमती या दहा लाखांच्या आत येतात. एमजी कॉमेटची सुरुवातीची किंमत 7,98,000 रुपये आहे. ही इंट्रोडक्टरी प्राईज आहे. यामुळे भविष्यात ती वाढणार आहे. टाटा टियागो ईव्हीची किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरु होते. टॉप व्हेरिअंटची किंमत 11.99 लाख रुपये आहे. एमजीनुसार कॉमेट कार १००० किमी चालवायची असेल तर चार्जिंगसाठी ५१९ रुपयांचा खर्च येतो.

टाटा टियागो ईव्हीमध्ये 19.2 KWh बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केली की 250 km पर्यंतची रेंज देते. तर कॉमेटमध्ये 17.3kWh ची लिथिअम आयन बॅटरी आहे जी 230 किलोमीटर एवढी रेंज देते.

कॉमेट ईव्ही घरी चार्ज केल्यास 3.3 किलोवॉट चार्जरद्वारे सात तासात पूर्ण चार्ज होते. तर टाटा टियागो ईव्हीमध्ये डीसी फास्ट चार्जिंग सुविधा मिळते. यामुळे ही कार एका तासात ८० टक्के चार्ज होते.

एमजी कॉमेट फिचर्समध्ये टियागोपेक्षा खूप चांगली आहे. एमजी ही हायटेक फिचर्ससाठी ओळखली जाते. कॉमेटमध्ये वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिविटी देण्यात आली आहे. 10.25 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, 55 हुन अधिक कनेक्टेड कार फीचर्स, व्हाईस कमांड, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, रिअर पार्किंग कॅमेरा आणि सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम , डिजिटल ब्ल्यूटूथ चावी आदी देण्यात आले आहेत.

तर टियाओ ईव्हीमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, हरमनची ४ स्पीकर, ऑटोमॅटीक एसी, रेन सेंसिंग वायपर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, ईबीडी, एबीएस, रिअरव्हू कॅमेरा एवढेच देण्यात आले आहे.