Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता

SRH 3 big concerns Kavya Maran, Mumbai Indians IPL 2024 MI vs SRH: सूर्याच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर मुंबईने हैदराबादला ७ विकेट्सने मात दिली.

SRH 3 big concerns Kavya Maran, Mumbai Indians IPL 2024 MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या संघाने सोमवारच्या सामन्यात अनपेक्षित कमाल करून दाखवली. स्वस्तात 3 गडी बाद झाल्यानंतर तिलक वर्माच्या साथीने शतकवीर सूर्यकुमार यादवने मुंबईला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.

सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 173 धावा केल्या होत्या. मुंबईने हे आव्हान सूर्याच्या नाबाद 102 धावांच्या खेळीच्या जोरावर 17.2 षटकात पूर्ण केले. मुंबईकडून झालेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH संघाला आता 3 चिंता सतावत आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल...

स्पर्धेच्या सुरुवातीपासून हेड-अभिषेक जोडीने संघाला तगडी सलामी दिली आहे. पण गेल्या काही सामन्यात या दोघांच्या बॅटमधून अपेक्षित धावा होत नाहीत. गेल्या चार सामन्यात या दोघांमध्ये एकही अर्धशतकी भागीदारी झालेली नाही.

हैदराबादचा संघ हा यंदाच्या हंगामात सर्वाधिक वेळा २०० पारचा टप्पा गाठणारा संघ आहे. पण SRHला ही कामगिरी प्रथम फलंदाजी करताना जमली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना RCB, KKR या संघांसमोर हैदराबादने लोटांगण घातल्याचे चित्र आहे.

हैदराबादच्या संघात वेगवान गोलंदाजांची यादी मोठी आहे. नटराजन हा १५ विकेट्ससह त्यांचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. याशिवाय भुवनेश्वर, कमिन्स, उनाडकटसारखे गोलंदाज आहेत. पण वेळेला विकेट काढून देणाऱ्या स्पिनरचा संघात अभाव आहे. वॉशिंग्टन सुंदरचा पर्याय हैदराबादने वापरून पाहिला पण त्याचा फारसा फायदा झालेला दिसला नाही.