Maruti च्या 'या' गाड्यांवर मोठा डिस्काउंट, खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:58 IST2022-05-14T19:48:26+5:302022-05-14T19:58:56+5:30
Maruti Suzuki Discount Offer : हा डिस्काउंट Nexa आणि Arena या दोन्ही डीलरशिपवर उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी कार घरी आणण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतो, कारण जपानी ऑटो निर्माता आपल्या कारवर मोठ्या डिस्काउंट्सच्या ऑफर देत आहे. हा डिस्काउंट Nexa आणि Arena या दोन्ही डीलरशिपवर उपलब्ध आहे.
या ऑफर एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बेनिफिट्स आणि कॅश डिस्काउंटच्या स्वरूपात आहेत. एरिना शोरूममधून मारुती सुझुकी कार खरेदी करून तुम्हाला या महिन्यात कोणते फायदे मिळू शकतात, यावर एक नजर टाकूया...
Swift वर मिळत आहे 21,000 डिस्काउंट
मारुती सुझुकी स्विफ्ट एमटी ही भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅकपैकी एक आहे. तुम्ही या महिन्यात या कार खरेदीवर 21,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर, आठ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर यांचा समावेश आहे.
Alto 800 मिळतेय चांगली ऑफर
ऑल्टो 800 चे पेट्रोल आणि स्टँडर्ड व्हेरियंट देखील या महिन्यात 21,000 रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते. एरिना शोरूम्स 8,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट 3,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर आणि कारसोबत 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहेत.
DZire वर मिळतोय 23 हजारांचा डिस्काउंट
मारुतीची परवडणारी सेडान DZire MT देखील या महिन्यात 23,000 रुपयांपर्यंत मोठ्या सवलतींसह येत आहे. या सवलतीच्या ऑफरमध्ये ग्राहक 3,000 रुपयांचे कॉर्पोरेट फायदे तसेच 10,000 रुपयांची रोख सूट आणि एक्सचेंज ऑफर घेऊ शकतात. मारुती सुझुकीकडून एस-प्रेसो एमटी ही मिनी एसयूव्ही खरेदी करून तुम्ही 28,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. एरिना शोरूम 15,000 रुपयांची रोख सवलत, 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आणि 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे.
WagonR वर 38,000 रुपयांची सूट
मारुती सुझुकी वॅगन आर ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. ही कार मे महिन्यात स्वस्त होते. वॅगन आर 1.0-लीटर 38,000 रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी करता येते, तर कारचे 1.2-लीटर प्रकार 18,000 रुपयांपर्यंतच्या ऑफरसह खरेदी केले जाऊ शकते. दरम्यान, सेलेरियो खरेदी करताना तुम्ही 33,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. हे 10,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस, तीन हजार रुपयांचा कॉर्पोरेट लाभ आणि 20,000 रुपयांच्या रोख सवलतीच्या स्वरूपात आहेत.