PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:17 IST2025-08-25T14:12:24+5:302025-08-25T14:17:20+5:30
Maruti e Vitara: जाणून घ्या Maruti च्या पहिल्या 'मेड इ इंडिया' EV कार चे फिचर्स...

PM Narendra Modi to Launch Maruti e Vitara: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki ची इलेक्ट्रिक SUV लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजे २६ ऑगस्ट २०२५ रोजी गुजरातमधील हंसलपूर येथे मारुती सुझुकीच्या पहिली इलेक्ट्रिक कार 'Maruti e Vitara' ला हिरवा झेंडा दाखवतील.
विशेष म्हणजे, संपूर्णपणे भारतात बनवलेली मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार जपानसह १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाईल. या नवीन इलेक्ट्रिक कारकडून कंपनीला मोठ्या आशा आहेत. ही कार बाजारात नुकत्याच लॉन्च झालेल्या ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकशी स्पर्धा करेल.
पंतप्रधान मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लांटमध्ये हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनाचे उद्घाटन देखील करतील. त्यानंतर अहमदाबादजवळील हंसलपूर कारखान्यात मारुती ई-विटाराच्या असेंब्ली लाइनचे उद्घाटन करतील, ज्यामुळे इलेक्ट्रिक एसयूव्हीचे उत्पादन सुरू होईल.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "मेक इन इंडियाच्या यशाचे उदाहरण म्हणून, पंतप्रधान सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक "e Vitara" चे उद्घाटन करतील. भारतात उत्पादित होणारी कार युरोप आणि जपानसारख्या बाजारपेठांसह शंभराहून अधिक देशांमध्ये निर्यात केले जाईल. यासह भारत सुझुकीच्या इलेक्ट्रिक वाहनांचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून काम करेल.
कंपनीने या वर्षी इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये मारुती ई विटारा प्रदर्शित केली होती. मारुती विटारा इलेक्ट्रिकबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देईल. याशिवाय, या कारमध्ये मानक म्हणून 7 एअरबॅग्ज दिल्या जात आहेत.
मारुती ई विटाराचा लूक आणि आकार 2023 मध्ये सादर केलेल्या मारुती ईव्हीएक्स कॉन्सेप्टसारखाच आहे. मात्र, यात काही गोष्टी बदल केल्या जातील. यामध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूला ट्राय-स्लॅश एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, पुढच्या बाजुला चार्जिंग पोर्ट मिळेल.
मारुतीने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह (४९ किलोवॅट आणि ६१ किलोवॅट) सादर केली आहे. यामध्ये, मोठ्या बॅटरी पॅकला ड्युअल-मोटर ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) सेटअप देण्यात आला आहे. यात चिनी कार कंपनी बिल्ड युअर ड्रीम (BYD) कडून घेतलेला ब्लेड सेल लिथियम आयर्न-फॉस्फेट (LFP) बॅटरी पॅक आहे.
या एसयूव्हीच्या पुढच्या एक्सलवर सिंगल मोटर असलेली ४९ किलोवॅटची बॅटरी १४४ एचपी पॉवर जनरेट करते. तर सिंगल-मोटरचा मोठा ६१ किलोवॅट बॅटरी पॅक १७४ एचपी पर्यंत पॉवर आउटपुट देतो.
ही कार आधूनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यात ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, AWD व्हर्जनसाठी 'ट्रेल'सह ड्राइव्ह मोड, हिल डिसेंट कंट्रोल, सिंगल-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, गरम केलेले आरसे आणि प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.