कार विकल्यानंतर FASTag चं काय करायचं? ‘हे’ काम आवश्यकच, अन्यथा बसेल मोठा फटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 03:37 PM2021-10-28T15:37:29+5:302021-10-28T15:41:57+5:30

जुनी कार किंवा वाहन विकल्यानंतर FASTag काय केले? तुमच्याच खात्यातून तर पैसे जात नाहीत ना? जाणून घ्या...

केंद्रातील मोदी सरकाने देशभरातील टोल प्लाझांवरील (Toll Plaza) वाहनांच्या मोठ्या रांगा कमी करण्यासाठी सर्व फोर व्हिलर वाहनांसाठी FASTag अनिवार्य केले आहे. एखाद्या व्यक्तीने नवीन वाहन खरेदी केले तर त्याला फास्टॅग घेणे आवश्यक आहे.

कोरोना संकटातून हळूहळू देश सावरत असताना ऑटोमोबाइल क्षेत्राला चांगला दिलासा मिळत असून, वाहन खरेदी विक्रीचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. काही ग्राहक नवीन कार खरेदीला पसंती देतात, मात्र, काही ग्राहक बजेटमुळे सेकंड हँड गाडी खरेदी करतात.

अशा परिस्थितीत, वाहन विकताना एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे तुमच्या जुन्या वाहनावर लावलेल्या FASTag चे काय करायचे? म्हणजे कार विकल्यानंतरही तुमचे खाते फास्टॅग लिंक राहते का? जाणून घ्या...

जर तुम्ही कार विकणार असाल तर, तुम्हाला तुमच्या कारच्या विक्रीबाबत माहिती तुमच्या कारसाठी FASTag जारी करणाऱ्या बँकेला द्यावी लागेल आणि तुमचे खाते बंद करावे लागेल. त्याची संपूर्ण माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

तुम्हाला कार विकल्यानंतर FASTag अकाउंट बंद करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. FASTag अकाउंट कसे बंद करणे सर्वांत आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

जर तुम्ही तुमचे वाहन नुकतेच विकले असेल आणि ते दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित केले असेल, तर तुम्ही तुमचा FASTag देखील निष्क्रिय-डिएक्टिवेट करावा. तुम्ही असे न केल्यास, वाहन ज्या टोल प्लाझातून जाईल त्याचे पैसे तुमच्या खात्यातून कापले जातील.

ज्या खात्याशी FASTag खाते लिंक असेल, त्या खात्यातून टोल पेमेंट वजा केले जाते. शिवाय, जर तुम्ही FASTag खाते निष्क्रिय केले नाही, तर तुमच्या कारच्या नवीन मालकाला देखील कारसाठी नवीन FASTag मिळू शकणार नाही. कारण, फक्त एकच सक्रिय FASTag वाहनाशी जोडला जाऊ शकतो.

फास्टॅग खाते बंद करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या फास्टॅग प्रदात्याच्या कस्टमर सपोर्ट-ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधणे आणि फास्टॅग लिंक केलेले खाते बंद किंवा निष्क्रिय करण्याची विनंती करणे. यासाठी तुम्हाला कस्टमर केअर सेवेला कॉल करावा लागेल.

FASTag संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १०३३ सुरू करण्यात आला आहे. १०३३ वर थेट कॉल करून ग्राहक FASTag संबंधित कोणत्याही समस्यांबाबतची उत्तरे मिळवू शकतात.

याशिवाय तुम्ही FASTag शी लिंक केलेले मोबाइल पेमेंट अॅप्लिकेशन वापरु शकता. तुमच्या FASTag जारी करणार्‍या बँकेच्या मोबाईल अॅप्लिकेशन किंवा प्रीपेड वॉलेटमध्ये लॉग इन करा आणि तुमचे FASTag खाते रद्द करण्यासाठीच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Read in English