233Km रेंज, केवळ 40 मिनिटांत होईल चार्ज..! किआनं लॉन्च केली जबरदस्त मिनी कार, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:59 AM2023-08-25T11:59:38+5:302023-08-25T12:13:58+5:30

महत्वाचे म्हणजे, या नव्या इलेक्ट्रिक कारची ऑफिशियल बुकिंग देखील सुरू झाली आहे.

साऊथ कोरीयन कार निर्माता कंपनी Kia Motor ने आपल्या EV पोर्टफोलियोमध्ये आणखी एक कार सामील केली आहे. कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये आपली नवी मिनी इलेक्ट्रिक कार Kia Ray EV सादर केली आहे. ही कंपनीची लाइनअप एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार आहे. महत्वाचे म्हणजे, या नव्या इलेक्ट्रिक कारची ऑफिशियल बुकिंग देखील सुरू झाली आहे.

'Kia Ray' इलेक्ट्रिक कार ही प्रामुख्याने अर्बन ड्रायव्हिंग डोळ्यासंदर्भात ठेवून तयार करण्यात आली आहे. हिचा लुक आणि डिझाइन बऱ्याच प्रमाणावर हिच्या पेट्रोल व्हेरिअंटला मॅच होते.

कमी किंमतीत एन्ट्री लेव्हल मिनी कार खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही कार योग्य आहे, अशे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही मिनी इलेक्ट्रिक कार 27,750,000 साऊथ कोरियन वॉनमध्ये (जवळपास 17.27 लाख रुपये) तयार करण्यात आली आहे.

ही कार एकूण 6 रंगांमध्ये सादर करण्या आली आहे. यात नवा स्मोक ब्लू कलर ऑप्शनही उपलब्ध आहे. याशिवाय कंपनीने इंटीरिअरला लाइट ग्रे आणि ब्लॅक ऑप्शन दिले आहे. कारच्या केबीनमध्ये 10.25 इंचाचे इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. याशिवाय कॉलम स्टाइल इलेक्ट्रॉनिक शिफ्ट लिव्हर, फ्लॅट फोल्डिंग सीट सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. फ्लॅट फोल्डिंग सीट्स देण्यात आले आहे. यामुळे वेळेनुसार केबिनमधील स्पेसही वाढवता येऊ शकतो.

कारची साइज - या कारची लांबी - 3,595 एमएम, रुंदी - 1,595 एमएम, उंची - 1,710 एमएम आणि व्हीलबेस - 2,520 एमएम एवढा आहे.

बॅटरी पॅक आणि परफॉर्मन्स - Kia Ray EV मध्ये 32.2 kWh एढ्या क्षमतेचा LFP (लिथिअम फेरोफॉस्फेट) बॅटरी पॅक देण्यात आला आहे. यात देण्यात आलेली 64.3 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार 86 hp पॉवर आउटपुट आणि 147 Nm एवढा टॉर्क जनरेट करते. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ही कार सिंगल चार्जमध्ये 205 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. तसेच सिटी कंडिशनमध्ये ही रेंज 233 किलोमीटर पर्यंत वाढू शकते.

चार्जिंग टाइम - ही इलेक्ट्रिक कार 150 किलोवॅट क्षमतेचे फास्ट चार्जर वापरून 40 मिनिटांच्या आत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत वेगाने चार्ज होऊ शकते. या शिवाय या कारसोबत 7 किलो वॅटचे ऑप्शनल पोर्टेबल चार्जरही मिळते. जे बॅटरी काही प्रमाणात स्लो चार्ज करते. या चार्जरच्या सहाय्याने कारची बॅटरी पूर्ण पणे चार्ज होण्यास जवळपास 6 तास लागतात.

कारची बुकींग - ही कार सध्या केवळ साऊथ कोरियनच्या बाजारात सादर करण्यात आली आहे. येथे या कारसाठी अधिकृत बुकिंग देखील सुरू झाली आहे. ही कार विक्रीसाठी 12 सप्टेंबरला लॉन्च केली जाईल. आरस्आ प्राइस सेग्मेंटमध्ये ही अत्यंत किफायतशीर इलेक्ट्रिक कार आहे.