Maruti Suzuki ला टक्कर देणारे Kia ची नवी लक्झरी कार, सनरुफशिवाय मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 12:06 PM2023-04-06T12:06:18+5:302023-04-06T12:15:19+5:30

ही लक्झरी कार ऑप्शनल व्हेरिअंट लक्झरी आणि लक्झरी प्लस व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.

कार उत्पादक Kia India ने आपली सर्वोत्कृष्ट एपीव्ही Carens चे एक नवे लक्झरी ऑप्शनल व्हेरिअंट लाँच केलं आहे. ही लक्झरी कार ऑप्शनल व्हेरिअंट लक्झरी आणि लक्झरी प्लस व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.

किया कॅरेन्सच्या या नव्या कारची किंमत 17 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही कार आता 7-सीटर मारुती अर्टिगाला टक्कर देणार आहे. या कारमध्ये अनेक नवी फीचर्स जोडण्यात आली आहेत. जाणून घेऊ याची माहिती.

किया कॅरेन्सच्या 1.5 लिटर टर्बो पेट्रोल डीसीटी व्हेरिअंटची किंमत 17 लाख एक्स शोरुम इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर 1.5 लिटर टर्बो डिझेल टीसी व्हेरिअंटची किंमत 17.70 लाख रुपये एक्स शोरुम आहे.

किया कॅरेन्स केवळ 7 सीटर कॉन्फिगरेशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत लक्झरी ऑप्शनसह येते. लक्झरी ऑप्शनल व्हेरिअंट 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येतं. जे ड्युअल क्लच ऑटोमॅटिक किंवा 1.5 लिटर टर्बो डिझेलसह टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकसह जोडले आहे.

किया कॅरेन्सचे नव्या लक्झरी ऑप्शनल व्हेरिअंट लक्झरी व्हेरिअंटच्या तुलनेत 2 अतिरिक्त फीचर्स देत आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक सनरुफ आणि ड्रायव्हिंग मोडशी लिंक्ड ॲम्बियंट लायटिंह सारखे जबरदस्त फीचर मिळेल.

या कारमध्ये एलईडी लाईट्ससह 10.25 इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले. 64 कलर लाईट, केबिन एअर प्युरिफायरसारखे फिचर्स लक्झरी ऑप्शनल व्हेरिअंटसह देण्यात आलेत.

याशिवाय यात लक्झरी सीट अपहोल्स्ट्री, मीडल रो टंबलसाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलीज, इलेक्ट्रॉनिक सनरूफ, ड्रायव्हिंगमोडशी लिंक्ड ॲम्बियंट लाईट असे फीचर्सही देण्यात आलेत.