Keeway SR 125: 'या' कंपनीने गुपचूप लॉन्च केली दमदार बाईक; पाहून RX100ची आठवण येईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:10 PM2022-10-13T18:10:01+5:302022-10-13T18:13:13+5:30

Keeway SR 125: पुढच्या आठवड्यात गाडीची बुकिंग सुरू होईल, तर महिन्याच्या अखेरपर्यंत डिलीव्हरी मिळेल.

Keeway SR 125 Launch: Keeway ने भारतीय बाजारात आपली नवीकोरी SR 125 (Keeway SR 125) लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 1.19 लाख रुपये(एक्स-शोरूम) ठेवली आहे.

या गाडीची बुकिंग सुरू झाली असून, वेबसाइटवर फक्त 1 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर या गाडीला बूक करता येईल. तसेच, आपल्या जवळच्या कीवे-बेनेली डीलरशिप (Keeway-Benelli Dealership) वरही याचे बुकिंग केले जाऊ शकते.

Keeway SR 125 ची टेस्ट राइड पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल. तसेच, या गाडीची डिलीव्हरी महिन्याच्या अखेरपर्यंत होईल. विशेष म्हणजे, SR 125 गेल्या पाच महिन्यात भारतात लॉन्च केलेली कंपनीची सातवी गाडी आहे. या गाडीला एन्ट्री-लेव्हल मोटरसायकल म्हणून सादर केले आहे.

SR 125 स्पोर्ट्स रेट्रो डिझाइन लूक दिले आहे. ही गाडी पाहून तुम्हाला 90च्या दशकातील लोकप्रिय RX100ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी ब्लॅक आणि ग्लॉसी रेड, अशा तीन कलर पर्यायांमध्ये गाडी उपलब्ध आहे.

Keeway SR 125 मध्ये 125cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे. ही गाडी 9,000 RPM वर 9.5 bhp पॉवर आणि 7,500 RPM वर 8.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

इंजिन 5-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्ससह येतो. यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि रिअरणध्ये ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक एब्जॉर्बर मिळतात.

मोटरसायकलमध्ये कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टीमसह दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहेत. ही गाडी तुम्ही बूक कराल, त्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो की, बाजारात या गाडीला टक्कर देणाऱ्या अनेक गाड्या उपलब्ध आहेत. यात Bajaj Pulsar NS125, TVS Raider 125 आणि Honda SP125 सामील आहे.